श्री अंबाबाई चरणी अर्पण सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजणी सुरु

 श्री अंबाबाई चरणी अर्पण सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजणी सुरु

कोल्हापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी वर्षभरात लाखो भाविक कोल्हापुरात हजेरी लावतात. अनेक भाविक देवीला रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिनेही अर्पण करतात. श्री अंबाबाई चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मोजणी आजपासून सुरु झालीय. ही मोजणी पूर्ण झाल्यानंतर, श्री जोतिबा चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचीही मोजणी होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीनं, श्री अंबाबाई मंदिरात आणि मंदिर आवारात १६ देणगी पेट्या ठेवल्या आहेत. या देणगी पेट्यांमध्ये अनेक भाविक रोख रक्कमेसह सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करतात. तसंच काही भाविक देवस्थान समिती कार्यालयात सोन्या- चांदीचा ऐवज देऊन, त्याची पावती घेतात. हा सर्व मौल्यवान ऐवज, देवस्थान समितीच्या ताब्यात असतो. एक-दोन महिन्यांनी दानपेटीतील रोख रक्कमेची मोजदाद केली जाते. मात्र देणगीरुपात आलेल्या दागिन्यांची मोजदाद वर्ष-दोनवर्षातून केली जाते,

यापूर्वी सन २०१९-२० मध्ये दागिन्यांची मोजणी झाली होती. त्यानंतर कोरोना कालावधीत जवळपास एक वर्ष मंदिर बंद होतं. त्यानंतर गेल्या ४ वर्षात देवीच्या चरणी अर्पण झालेल्या दागिन्यांची मोजणी आजपासून सुरु झालीय. पुढील १५ दिवस दागिन्यांची मोजणी आणि मुल्यांकन होईल. त्यानंतर महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री जोतिबा चरणी अर्पण झालेल्या दागिन्यांचीही मोजणी होणार आहे.

ML/ML/SL

19 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *