पालघर मध्ये फुलली ऑर्किड फुलांची शेती

पालघर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण म्हटले की आपल्या समोर तिथली भुरळ घालणारी निसर्गसंपन्नता समोर येते. तिथला समुद्र किनारा,नारळ, सुपारी,आंबे यांच्या बागा . अशा कोकणात विविध शेतकरी शेतीमध्ये प्रयोग करत असतात. असाच वेगळा प्रयोग केला आहे. रामचंद्र सावे आणि त्यांच्या बंधुंनी . सावे यांच्याकडे स्वतःची फार कमी जमीन होती. भाजीपाल्याची ते शेती करत होते. शेतीची आवड आणि कष्ट करण्याची तयारी असल्याने त्यांच्या चार भावानी मिळून आज डहाणु मधील चिंचणी गावात शेती वाढविण्याचा निर्धार केला आणि तो सत्यात उतरविला.
भाजीपाल्याची शेती करताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत होते. प्रसंगी त्यांचे आर्थिक नुकसानही झाले. हे करत असताना त्यांनी पुणे, कोल्हापूर , सांगली परिसरात ऑर्किड फुलांची शेती करणा-याशी संवाद साधून भेटी दिल्या.त्यासोबतच त्यांनी भाग्यश्री पाटील यांच्या राईज अँन शाईन या कंपनीत येऊन त्यांनी याबद्दलची तांत्रिक माहिती घेऊन तीन लाख साठ हजार ऑर्किड रोपे खरेदी केली.
या कंपनीच्या माध्यमातून सावे यांना थायलंड मधील ऑर्किड फुल शेती करणारे शेतकरी यांच्याशी भेट करुन देण्यात आली. याकरता विशेष मार्गदर्शन कंपनीचे जनरल मँनेजर श्रावण कांबळे आणि त्यांच्या टीमने केले. सध्या नऊ एकरावर शेडनेट मध्ये ही फुलांची शेती केली असून या त्यांच्या जिद्दीचे भाग्यश्री पाटील यांनी भेट देऊन कौतुक केले आहे.
रामचंद्र सावे यांच्या सोबत त्याचे बंधू भानुदास सावे यांच्या मुलगा वय वर्ष 35 असणा-या प्रसाद सावेही या ऑर्किड फुल शेती मध्ये उतरला असून तो अँटोमोबाईल इंजिनियर आहे. पण नोकरीची वाट न धरता त्यांने पूर्णवेळ या फुलशेती करता देण्याचा निर्धार केला आहे. यात त्याला चांगले यश मिळाले आहे.
ML/ML/SL
19 June 2024