आयशर ट्रकची धडक, पाच महिला ठार

सोलापूर, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगोला तालुक्यातील चिकमहुद येथे एका ट्रकने सात महिलांना धडक दिली. यामध्ये पाच महिलांचा मृत्यू झाला आहे तर दोन महिला गंभीर जखमी आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
सांगोला तालुक्यातील चिकमहुद बंडगर वाडी परिसरात काम झाल्यानंतर काही महिला कामगार वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या. प्रसंगी कोळसा वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने या वाहनाची महिलांना धडक बसली. यामध्ये पाच महिलांचा जागेचा मृत्यू झाला. तर दोन महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये आयशर ट्रक मधील एक व्यक्ती पळून गेला असून एक व्यक्ती पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. महिलांवर अचानक काळाने घाला घातल्याने सांगोला परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ML/ML/SL
19 June 2024