आमदार पी. एन. पाटील अनंतात विलीन
कोल्हापूर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हजारोंच्या साक्षीन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सडोली खालसा या मुळ गावी पाटील यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र राहुल पाटील यांनी पाटील यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
राज्य सरकारच्या वतीन उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी श्रद्धांजली वाहिली.
अंत्यसंस्कारावेळी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे, मालोजीराजे लातूरचे आमदार धीरज देशमुख, सांगलीचे विशाल पाटील उपस्थित होते.
आज पहाटे साडे पाचच्या सुमारास पाटील यांची प्राणज्योत मालवली. आमदार पाटील यांच्या मुळ गावी सडोली खालसामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला आमदार पी. एन. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची सूचना दिल्या होत्या.
ML/ML/SL
23 May 2023