अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आलेल्या सरकारला पत्रकारांनी धरले धारेवर

 अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी आलेल्या सरकारला पत्रकारांनी धरले धारेवर

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधानमंडळात आज सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री शंभुराज देसाई, संजय बनसोडे हे विधानभवनातील पत्रकार कक्षात आले. राज्यातील सर्वच घटकांना न्याय देणारा अंतरिम अर्थसंकल्प असल्याची स्तुतीसुमने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या वर उधळीत असतांनाच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो तातडीने मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्या दिशेने गेले. सर्व घटकांना न्याय मिळाल्याचे आपण सांगताहात परंतु पत्रकारांना न्याय मिळालेला नाही, अशा शब्दांत जोरदार तक्रार केली.

त्याबरोबर सर्वच पत्रकारांनी असंतोष व्यक्त करीत मे २०२३ मध्ये देण्यात आलेली आश्वासने अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. शासन निर्णय निघालेला नाही. शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दोन दिवसांत जी आर निघेल असे सांगितले होते पण दोन अधिवेशने होऊनही जी आर निघालेला नाही, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले.

पत्रकारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कडे पत्रकारांना तत्काळ न्याय देण्यासाठी जोरदार आग्रह धरला अखेर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असल्याची घोषणा केली आणि त्यासाठी एक बैठक बोलावली जाईल असे आश्वासन दिले.

ML/KA/SL

27 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *