UPSC च्या तयारीसाठी ५० हजारांचे आर्थिक सहाय्य
पुणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल लागला असून उत्तीर्ण उमेदवार आता मुख्य परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी तर्फे राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२३ साठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे.
महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचे जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र ठरले अशा उमेदवारांना पन्नास हजार रुपयांचे सहाय्य प्रदान केले जाणार आहे. अर्ज केलेल्यांना हा लाभ मिळेल.
उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी, अनुसूचित जातीचा व मुख्य परीक्षेसाठी पात्र असावा अशा अटी आहेत. योजनेचा लाभ एका लाभार्थ्यास फक्त तीनच वेळा घेता येईल. ज्यांनी यापूर्वी योजनेचा लाभ तीन वेळा घेतला आहे त्यांना लाभ मिळणार नाही. बार्टी संस्थेने दिलेल्या लिंकवर उपलब्ध अर्जाची प्रिंट काढून अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जुलै आहे.
SL/KA/SL
16 June 2023