दादा भडकले, फडणवीसांची दिलगिरी

 दादा भडकले, फडणवीसांची दिलगिरी

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सभागृहात मंत्री सातत्याने अनुपस्थित राहत असल्यामुळे सभागृहाच्या परंपरेला बाधा येत आहे, अशी काय कामे असतात मंत्र्यांना , पद घेताना मागे मागे फिरतात , संसदीय कामकाज मंत्री देखील अनुपस्थित राहतात , सभागृहात तहकूब करण्याची नामुष्की ओढवली आहे, हे गलिच्छ पणाचे कामकाज ,इथल्या कामात कोणालाही रस नाही, हा निर्लज्ज पणाचा कळस गाठला आहे अशी कडक टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केली.

सदरची बाब गंभीर आहे, त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो , रात्री उशिरा कामकाज पत्रिका निघाली त्यामुळे मंत्र्यांना तयारी करायला वेळच मिळाला नाही, त्यासाठी कामकाज पत्रिके बाबत थोडी सुधारणा करावी , मात्र सर्व मंत्र्यांना सूचना देण्यात येतील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

या अधिवेशन काळात २३७६ लक्ष वेधी आँनलाईन प्राप्त झाल्या त्यापैकी ५७ चर्चेला घेण्यात आल्या , सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत, वेळेत कार्यक्रम पत्रिका दिली जाईल , आजच्या दिवसात विधान कार्य मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची एकत्र बैठक घेऊन लक्षवेधी साठी दिवस ठरवून देतो असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात स्पष्ट केलं.

याआधी आज आणि काल सकाळी विशेष सत्रात लक्षवेधी सूचनांच्या चर्चेसाठी संबधित मंत्री उपलब्ध नसल्याने सभागृहाचं कामकाज तहकूब करावे लागले होते.

ML/KA/PGB
15 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *