परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या लोकांकडून भरारी पथक जखमी

 परीक्षेत कॉपी पुरवणाऱ्या लोकांकडून भरारी पथक जखमी

अहमदनगर, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील टाकळीमानुर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीना कॉपी पुरवणाऱ्या जमावाकडून लाठ्या-काठ्या घेवून भरारी पथकावर दगडफेक करत परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये भरारी पथकातील पंचायत समितीचे अभियंता रामेश्वर शिवणकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत माहिती अशी की, आज दुपारी साडेबारा वाजता टाकळीमानुर येथील जय भवानी माध्यमिक विद्यालयात दहावीचा भूमिती विषयाचा 217 विद्यार्थ्यांचा पेपर सुरू होता त्यावेळी परीक्षार्थींना कॉफी पुरवणाऱ्या जमावाणे परीक्षा केंद्रात बळजबरी प्रवेश करत भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावून परीक्षार्थींना कॉपी करण्यास मुभा देण्याची मागणी केली, यावर भरारी पथक प्रमुख गटविकास अधिकारी जगदीश पालवे यांनी सदरील कॉपी पुरवणाऱ्या इसमांना परीक्षा केंद्राच्या बाहेर जाण्यास सुचवले. मात्र या गोष्टीचा राग येऊन सदरील जमावाने परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणावर लाठ्या-काठ्या,दगड,गोटे यांच्या सहाय्याने जोरदार हल्ला केला.

यावेळी झालेल्या दगड फेकीत भरारी पथकातील रामेश्वर शिवणकर यांच्या चेहऱ्यावर दगड लागून ते गंभीर जखमी झाले आहेत.
परीक्षा केंद्रावरील पोलीस कर्मचाऱ्यांनी भरारी पथकातील कर्मचाऱ्यांना या हल्ल्यातून वाचवले, मात्र झालेल्या दगडफेकीत गटविकास अधिकारी जगदीश पालवे हे देखील किरकोळ जखमी झाले आहेत.

भरारी पथकातील जखमी कर्मचारी रामेश्वर शिवणकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना टाकळीमानूर येथून पुढील उपचारासाठी तात्काळ पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याने त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

यापूर्वी देखील कॉपी पुरवणाऱ्या हल्लेखोरांनी गणिताच्या पेपरला कॉपी विरोधी पथकातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी करून परीक्षार्थीना कॉपी पुरवल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायदे यांनी घटना ठिकाणी भेट दिली असून सरकारी कामात अडथळा आणून सरकारी कर्मचाऱ्यांना जखमी केल्या बाबत कायदेशीर फिर्याद दाखल करण्याच्या हालचाली सुरु आहेत.supplying copies in exams

या घटनेची वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेण्यात आली असून यापुढील कालावधीत या परीक्षा केंद्रावर वरिष्ठ दर्जाचे भरारी पथक बसून राहणार असल्याची माहिती समजली आहे.

ML/KA/PGB
15 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *