सावरकर नाट्य सादरीकरण 2023
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि मधुसूदन कालेलकर ह्यांच्या प्रतिभेचे प्रज्ञोत्तम प्रमाण असे
” संगीत उत्तर क्रिया”
सागरा प्राण तळमळला ”
ह्या दोन महानाट्यांचा प्रयोग सावरकर विचार आणि आचार ह्यांचा समाजमानसावरील सर्वोच्च संस्कार म्हणून करायचा आहे यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
26 फेब्रुवारी ते 10 मे ह्या दरम्यान अभिवाचन ते प्रयोग असा संकल्प आहे.
रथ जगन्नाथाचा ह्याला हात मात्र सगळ्यांचा हवा आहे.कलाकार आणि कार्यकर्ता अशी आपली टीम हवी आहे.
ह्यासाठी आपण येत्या 5 फेब्रुवारी भरतमुनी जयंतीचा मुहुर्त साधत आहोत.
पाच फेब्रुवारी सकाळी 11 ते 2 आपण सावरकर विचार प्रचारक अभ्यासक विद्यार्थी कलोपासक आपल्या वेळेचे नियोजन करावे अशी विनंती संस्थेने केली आहे.
बैठक स्थान
ए 203 जावळे बिल्डिंग आदर्श स्वीट मार्ट च्या वर दहिसर पुर्व 68.
संपर्क —
डाॅ. शिरीष ठाकूर
संयोजक
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळ दहिसर.
9029884055.
Savarkar Drama Presentation 2023
ML/KA/PGB
27 Jan. 2023