छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीबाबत शिंदे-फडणवीस सरकारचा एक महत्त्वाचा निर्णय
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन सहा महिने झाले आहेत. या काळात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नुकतेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीवरून वाद निर्माण झाला होता. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक यावरुन मतमतांतरे तसेच विवाद सुरु आहे.An important decision of the Shinde-Fadnavis government regarding the birth anniversary of Chhatrapati Sambhaji Maharaj
मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीबाबत शिंदे-फडणवीस सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती 14 मे रोजी शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय होणे शक्य नव्हते, मात्र आता शिंदे -फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी हे करून दाखवले आहे.
शिंदे-फडणवीस सरकार यंदा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करत आहे. या वर्षीपासून शासकीय कार्यालयात वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे.
ML/KA/PGB
20 Jan. 2023