सातरस्ता येथील संत गाडगे महाराज उद्यान झाले गरदुल्ल्याचे बस्तान, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सातरस्ता येथील संत गाडगे महाराज उद्यान हे सध्या गर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचे घर झाले आहे. या उद्यानात अनेक स्थानिक रहिवाशी वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुले खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी येत असतात. परंतु गेल्या अनेक महिन्या पासून या ठिकाणी या उद्यानात मोठ्या प्रमाणात गर्दुल्ले, भीक मागणारे आणि चरसुलले यांचा वावर असल्याने स्थानिक नागरिकांनी लहान मुलांनी आणि नागरिकांनी या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे. या उद्यानात हे गर्दुल्ले दारू,चरस, गांजा या ठिकाणी सर्रासपणे पित असतात. तर तासंन तास या ठिकाणी बसून असतात. त्याच प्रकारे येथेच जेवतात रात्री येथेच झोपतात. तसेच याच ठिकाणी लघु शंका आणि प्रातविधी करतात. त्यामुळे या उद्यानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले असून दुर्गंधी पसरली आहे.तरी या ठिकाणी वॉचमन आणि सिक्युरिटी तैनात करावे. तसेच येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे या गर्दुल्ले यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी, नागरिक आणि लहान मुले करत आहेत.
बाईट
या उद्यानातील गर्दुल्ले आणि चरसुल्ले याबाबत आमच्याकडे अनेक तक्रारी आले असून याबाबत आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कळविले असून यावर त्वरित कारवाई होईल. तसेच या ठिकाणी एक वॉचमन नेमला जाईल त्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळेल अशी माहिती स्थानिक नगरसेवक रोहिदास लोखंडे यांनी दिली.KK/ML/MS