‘mAadhaar’ अ‍ॅप लवकरच होणार बंद

 ‘mAadhaar’ अ‍ॅप लवकरच होणार बंद

मुंबई, दि. १९ : भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने जुने ‘mAadhaar’ अ‍ॅप लवकरच बंद करण्याचा निर्णय घेतला असून नागरिकांना नवीन Aadhaar App डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे. डिजिटल ओळख अधिक सुरक्षित, वेगवान आणि गोपनीय बनवण्यासाठी हा मोठा बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नव्या अ‍ॅपमध्ये फेस ऑथेंटिकेशन, QR-आधारित शेअरिंग आणि अधिक प्रायव्हसी कंट्रोल्स यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत.

UIDAI ने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे mAadhaar अ‍ॅप “रिटायर” होणार असल्याची माहिती दिली आहे. अनेक वर्षांपासून वापरात असलेले हे अ‍ॅप आता टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून त्याऐवजी नवीन Aadhaar App वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जुने अ‍ॅप तांत्रिकदृष्ट्या मर्यादित होत चालल्याने आणि वाढत्या डिजिटल सुरक्षेच्या गरजांमुळे हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

UIDAI ने अद्याप जुने mAadhaar अ‍ॅपमधील डेटा आपोआप नवीन अ‍ॅपमध्ये ट्रान्सफर होईल का याबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यामुळे अनेक वापरकर्त्यांना नवीन अ‍ॅपमध्ये पुन्हा लॉगिन करून आधार माहिती, मोबाइल नंबर आणि कुटुंबातील सदस्यांचे प्रोफाइल नव्याने जोडावे लागू शकते. काही तंत्रज्ञान अहवालांनुसार, जुन्या अ‍ॅपचा डेटा थेट माइग्रेट न होण्याची शक्यता आहे.

नवीन आधार अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइड आणि iPhone दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आले आहे. वापरकर्ते गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोर वरून अधिकृत यूआयडीएआय आधार अ‍ॅप डाउनलोड करू शकतात. अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल नंबरद्वारे ओटीपी पडताळणी करून प्रोफाइल तयार करावे लागेल. यूआयडीएआयने फेक अ‍ॅप्सपासून सावध राहण्याचाही इशारा दिला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *