राजा शिवाजी चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

 राजा शिवाजी चित्रपटाची १०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री

मुंबई, दि. १८ : रितेश देशमुखचा ड्रीमप्रोजेक्ट ‘राजा शिवाजी’ गेल्या १० वर्षांपासून नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ (९० ते १०० कोटी) चित्रपटाचा असलेला रेकॉर्ड मोडीत काढत ‘राजा शिवाजी’नं अवघ्या तीन आठवड्यांत बॉक्स ऑफिसवर विजयी वाटचाल केली आहे.

तिसऱ्या वीकेंडलाही प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्यामुळं राजा शिवाजी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली आहे. निर्मात्यांनी अधिकृत दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई १०० कोटींच्यावर कमाई केली आहे.

राजा शिवाजी चित्रपटाने देशात ९३.१० कोटींच्यावर कमाई केली आहे. तर चित्रपटानं परदेशात ४.९० कोटींचा गल्ला जमवलाय. तर एकूण कमाई ही ११४ कोटींच्या घरात कमाई केली. महाराष्ट्र दिनाचं (१ मे) औचित्य साधून रिलीज झालेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी ११.३५ कोटींची ऐतिहासिक ओपनिंग केली होती. पहिल्याच आठवड्यात चित्रपटानं ५७.७० कोटींचा गल्ला जमवला होता.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *