कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृहाची दुरावस्था

 कल्याणमधील आचार्य अत्रे नाट्यगृहाची दुरावस्था

कल्याण, दि. ११ : सध्या मराठी रंगभूमीला चांगली दिवस आले आहे. अनेक नवी जुनी नाटके ‘हाऊस-फुल’ चा बोर्ड मिरवत आहे. प्रेक्षकांच्या मोठा प्रतिसाद मिळत असतानाही नाट्यगृहांतील दुरावस्थेमुळे कलाकार आणि प्रेक्षक त्रस्त झाले आहेत. कल्याण येथील आचार्य अत्रे नाट्यगृह विविध प्रकारच्या अडचणींमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. अलबत्या गलबत्या’ या लोकप्रिय बालनाट्यातील कलाकारांनी अत्रे नाट्यगृहाच्या अव्यवस्थेला वाचा फोडली आहे. येथील असुविधांमुळे थेट प्रयोगांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. प्रयोगादरम्यान होणारे शॉर्ट सर्किट आणि बंद असलेले एसी यामुळे नाट्यगृहाची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली आहे. ‘अलबत्या गलबत्या’च्या कलाकारांनी येथील गैरसोयींबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने, आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचा इशारा कलाकारांनी दिला आहे.

अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढताना सांगितले की, प्रयोगादरम्यान वारंवार होणाऱ्या इलेक्ट्रिक स्पार्किंगमुळे अनेकदा नाटक मध्येच थांबवावे लागते. यामुळे प्रेक्षक आणि कलाकार या दोघांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा (AC) अनेकदा बंद असते, ज्यामुळे उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. हे गोष्टी वारंवार होत आहे. त्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

या प्रकरणावरून आता राजकारणही तापले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी उमेश बोरगावकर यांनी या परिस्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. लॉकडाऊन काळात नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मग तो निधी गेला कुठे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *