वानखेडे स्टेडिअमच्या ग्राऊंड स्टाफमध्ये पांड्याने वाटले लाखोंचे चेक
मुंबई, दि. 27 : मुंबई इंडियन्सच्या कर्णधार हार्दिक पांड्यांने वानखेडे स्टेडिअमच्या ग्राऊड स्टाफच्या कामगिरीवर खूश होत अक्षरशः रोख बक्षिसांची लयलूट केली आहे. ग्राउंड स्टाफ मधील ११ जणांना पांड्याने प्रत्येकी तब्बल १० लाख रुपयांचे बक्षिस दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिकने टी-20 वर्ल्डकपसाठी मुंबईच्या वानखेडे मैदानातच तयारी केली होती. हार्दिक पांड्या सराव करत असल्या कारणाने ग्राऊंड स्टाफला रात्री उशिरापर्यंत मैदानात थांबावं लागत होतं. यामुळे हार्दिकने त्यांना आश्वासन दिलं होतं की, जेव्हा कधी तो मुंबईत परत येईल तेव्हा टी-20 वर्ल्डकपच्या तयारीत केलेल्या मदतीचं बक्षीस नक्की देईल. सोशल मीडियावर एक फोटोदेखील समोर आला आहे. या फोटोमध्ये हार्दिक पांड्या ग्राऊंड स्टाफसोबत उभा असल्याचं दिसत आहे. यावेळी ग्राऊंड स्टाफच्या हातांमध्ये चेक दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्याने ग्राऊंड स्टाफला 10-10 लाखांचा चेक दिला आहे.
हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकप विजयात मोलाची भूमिका निभावली होती. त्याने 9 सामन्यातील 9 डावांमध्ये फलंदाजी करत 9 डावांमध्ये 217 धावा केल्या. तसंच गोलंदाजीतही योगदान देत 9 विकेट मिळवल्या. हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा आपल्या या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.