Milind

महानगर

भाई सुभाषचंद्र मयेकर यांना ‘लोकसेवक’ पुरस्कार

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात मोठ्या विविध पदांवर प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले प्रख्यात कवी, साहित्यिक सुभाषचंद्र शांताराम उर्फ भाई मयेकर यांना नुकताच एकता कल्चरल अकादमीचा २०२५-२०२६ चा ‘लोकसेवक’ पुरस्कार एका शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार, नवशक्ति चे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी, भगवान निळे, सदानंद राणे, अजय कांडर, शरण बिराजदार, डॉ. […]Read More

देश विदेश

“बेळगावीतील साखर कामगारांचे बळी व्यवस्थेतील गंभीर त्रुटी अन् प्रशासनाच्या हाराकिरीमुळे!

केवळ अपघात किंवा दुर्घटनानव्हे, तर एक मानवी शोकांतिका विक्रांत पाटील बेळगावी जिल्ह्यातील इनामदार शुगर वर्क्समध्ये आठ कामगारांचा मृत्यू हा अपघात नव्हता, तर सुरक्षेच्या नियमांना पायदळी तुडवून घडवून आणलेले एक टाळता येण्याजोगे हत्याकांड होते. या दुर्घटनेने अनेक कुटुंबे उध्वस्त केली आहेत. सुरुवातीला जरी या घटनेचे वर्णन ‘बॉयलर स्फोट’ म्हणून केले गेले असले, तरी सत्य त्याहून वेगळे […]Read More

महानगर

विजयाची मशाल निश्चितच प्रज्वलित होणार

मुंबई, दि १२भांडुपच्या प्रभाग क्र ११४ च्या उमेदवार राजुल संजय पाटील (उबाठा/मनसे) यांची रमाबाई नगर नं. १ ते अशोक केदारे चौकपर्यंत काल भव्य प्रचार फेरी पार पडली. या फेरीला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे, आणि त्यांच्या साथीने प्रभाग क्र ११४ मध्ये विजयाची मशाल निश्चितच प्रज्वलित होणार आहे असे राजुला पाटील यांनी माध्यमाशी […]Read More

महानगर

सत्तेच्या गणितात भाजपची नैतिकता शून्य

ॲड. श्रीनिवास बिक्कड देशात आणि राज्यात मूळ संघ, भाजपचे कार्यकर्ते आणि नेतेच पक्षात अल्पसंख्यांक झाले आहेत. ज्यांनी कठीण काळात पक्ष वाढवला, संकटात झेंडे हातात घेतले, सत्ता नसताना उपेक्षा आणि अपमान सहन केले. असंगाशी संग आणि विचारांना तिलांजली ही स्वत:ला पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या भाजपची सध्याची स्थिती आहे. नैतिकता, शूचिता आणि मूल्याधिष्ठित राजकारणाचे गोडवे गाणाऱ्या […]Read More

विदर्भ

ईरई नदीकाठी वाघीण मृतावस्थेत आढळली

चंद्रपूर दि १२ :- चंद्रपूर वनविभागांतर्गत येणाऱ्या पायली-भटाली बिटमधील दुर्गापूर क्षेत्रात, चिचोली गावाजवळ ईरई नदीकाठी नॉन-फॉरेस्ट (वनबाह्य) परिसरात सकाळच्या सुमारास एक तरुण वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक पाहणीत मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याचे तसेच शरीराचे सर्व अवयव शाबूत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून वनविभागाकडून सखोल चौकशी […]Read More

विदर्भ

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शुद्ध गावरान गुळाची वाढली मागणी…

वाशीम दि ११ : वाशीम जिल्ह्यात मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर गावरान गुळाच्या मागणीत मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील रिधोरा परिसरात सेंद्रिय आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणाऱ्या शुद्ध गावरान गुळासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. संक्रांतीसाठी आवश्यक असलेल्या तिळगुळासाठी यंदा ग्राहकांचा कल बाजारातील प्रक्रिया केलेल्या गुळाऐवजी नैसर्गिक, रसायनमुक्त गावरान गुळाकडे अधिक झुकलेला दिसून येत […]Read More

महानगर

मुंबईसाठी पायाभूत सुविधांचे नवे युग : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा

भारताची आर्थिक राजधानी, स्वप्नांची नगरी आणि देशाचे आर्थिक इंजिन असलेल्या मुंबईने गेल्या दशकात अशा एका परिवर्तनाचा अनुभव घेतला आहे, ज्याची तुलना जागतिक स्तरावरील केवळ मोठ्या महानगरांशी केली जाऊ शकते. दुर्दैवाने एकेकाळी रखडलेले प्रकल्प, वाढती वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांवरील प्रचंड ताण ही मुंबईची ओळख बनली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राबवलेल्या ‘मुंबई […]Read More

खान्देश

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र

By विक्रांत पाटील जळगाव येथील जैन हिल्सवर दरवर्षी भरणारा कृषी महोत्सव हा केवळ एक प्रदर्शन किंवा मेळावा नाही, तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक ‘कृषी तीर्थक्षेत्र’ बनला आहे. हे एक असे ठिकाण आहे, जिथे शेतकऱ्यांना केवळ नवीन तंत्रज्ञान पाहता येत नाही, तर ते आत्मसात करून आपल्या शेतात क्रांती घडवण्याची प्रेरणा मिळते. या महोत्सवामागे एक प्रामाणिक विचार […]Read More

विदर्भ

काटेपूर्णा अभयारण्यात पार पडली आशियाई पाणपक्षी गणना

वाशिम दि ११ : पश्चिम विदर्भातील वाशीम व अकोला जिल्ह्यात विस्तारलेले, ‘पाणी देणार जंगल’ अशी ओळख असलेले काटेपूर्णा अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या अभयारण्यात असलेला जलाशय देशी-विदेशी पाणपक्ष्यांचे प्रमुख आश्रयस्थान असून दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या संख्येने दाखल होतात. काटेपूर्णा जलाशयातील मानवनिर्मित द्वीपावर शेकडो पाणपक्ष्यांचा वावर कायमस्वरूपी पाहायला मिळतो. […]Read More

महानगर

राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये

कर्तृत्त्ववान, युवा उमेदवाराला मत देण्याचे आवाहन मुंबई, दि. १० – ऱाष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज भांडुप पश्चिम येथे येऊन राजुल संजय पाटील यांचा प्रचार केला. राजुल या कष्टाळू, कर्तृत्त्ववान असून आपल मत युवा पिढीच्या राजुल पाटील यांना द्यावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. राजुल पाटील या प्रभाग क्रमांक ११४ मधून निवडणुक लढवित आहेत. […]Read More