छत्रपती शिवरायांचे पिताश्री शहाजीराजेंच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा

 छत्रपती शिवरायांचे पिताश्री शहाजीराजेंच्या आयुष्यावरील चित्रपटाची घोषणा

मुंबई, दि. 1 : आज महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर डावखर फिल्म्स प्रस्तुत आणि संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित ‘शहाजीराजे’ (Shahaji Raje Marathi Movie) या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. शहाजीराजे भोसले यांची यशोगाथा सांगणारा हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला चित्रपट आहे. ‘शहाजीराजे’ हा चित्रपट 2027 साली प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट तब्बल 6 भाषांमध्ये सादर केला जाणार असून, मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या भव्य चित्रपटात शहाजीराजेंची भूमिका नेमकी कोण साकारणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले, “महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने ‘शहाजीराजे’ची घोषणा करणं आमच्यासाठी खूप खास आहे. आपल्या इतिहासातल्या अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वांपैकी शहाजीराजे हे अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, जो आम्ही अभिमानाने प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत. नेहमीप्रमाणेच आम्ही आपल्या संस्कृतीशी आणि इतिहासाशी जोडलेली कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत.”

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *