ऍडव्हान्स बुकींगमध्येच ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने कमावले 4.26 कोटी
मुंबई, दि. १ : रितेश देशमुख निर्मित आणि दिग्दर्शित राजा शिवाजी हा तब्बल १०० कोटींचे बजेट असलेला चित्रपटाचे आज महाराष्ट्र दिनी सर्वत्र प्रदर्शित झाला. ॲडव्हान्स बुकिंगच्या टप्प्यात ‘राजा शिवाजी’ च्या एकूण 201,990 तिकिटांची विक्री झाली आहे. नियोजित शोची एकूण संख्या 5698 इतकी आहे. विशेष म्हणजे, केवळ मराठीमधूनच आतापर्यंत 4.26 कोटींचा व्यवसाय केला आहे, तर हिंदीमधून ॲडव्हान्स बुकिंगमध्ये 85 लाखांची कमाई झाली आहे.
या चित्रपटाने मुंबईमध्ये 1.89 कोटींचा व्यवसाय केला आहे. इतर प्रमुख कमाई पुणे 1.26 कोटी, औरंगाबाद 10.9 लाख, कोल्हापूर 7.79 लाख, नागपूर 719 लाख, नाशिक 13.45 लाख आणि सांगली 2.62 लाखांचा समावेश होतो. हे आकडे मराठी मधील बुकिंगची आकडेवारी दर्शवतात. हिंदीमध्ये, दिल्ली-NCR विभागाने एकूण कलेक्शनमध्ये 7 लाखांची कमाई झाली आहे. हिंदीमधील कमाई सध्या जरी माफक असली, तरी मराठीमध्ये प्रचंड चर्चा निर्माण करण्यास, बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवण्यास हा सिनेमा सज्ज आहे. चित्रपटातील नामवंत कलाकारांची उपस्थिती किती फायदेशीर ठरते आणि रिलीज पहिल्याच दिवशी हा चित्रपट किती कोटींची कमाई करण्यात यशस्वी होतो, हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरेल.