इंफाळ विमानतळावर दिसले UFO

 इंफाळ विमानतळावर दिसले UFO

छायाचित्र काल्पनिक

इंफाळ, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंफाळ विमानतळावर काल अज्ञात उडणारी वस्तू (UFO) दिसल्याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) दिली. त्यामुळे इंफाळ विमानतळावर 3 तास गोंधळ उडाला होता. इम्फाळला येणारी दोन उड्डाणे कोलकात्याकडे वळवण्यात आली. तर तीन विमानांच्या लँडिंगला उशीर झाला.

इम्फाळ विमानतळाचे संचालक चिपेम्मी केशिंग यांनी ड्रोन दिसल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सुरक्षेची परवानगी मिळाल्यावरच तीन विमानांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यात आली होती, असेही ते म्हणाले. विमानतळावरील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, सुमारे तासभर आकाशात एक मोठी वस्तू उडताना दिसली.

इम्फाळचे हवाई क्षेत्र आणि उड्डाण ऑपरेशन तातडीने बंद करण्यात आल्याचेही वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे सुमारे एक हजार प्रवाशांचे हाल झाले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) इंफाळच्या हवाई क्षेत्राचे नियंत्रण हवाई दलाकडे सोपवले. हवाई दलाच्या मंजुरीनंतरच इम्फाळमध्ये व्यावसायिक उड्डाण ऑपरेशन्स पुन्हा सुरू करण्यात आली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि जमिनीवर उपस्थित असलेल्या लोकांनी दुपारी दोनच्या सुमारास ड्रोन पाहिले. यानंतर एअर इंडियाच्या दोन आणि इंडिगोच्या एका फ्लाइटला लँड न करण्यास सांगण्यात आले. त्याचवेळी (दुपारी 2) इंफाळला येणारी दोन उड्डाणे वळवण्यात आली.

SL/KA/SL

20 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *