अन्न महामंडळाच्या साठ्यातून लाखो टन गहू आणि तांदूळ खुल्या बाजारात उपलब्ध

नवी दिल्ली, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या माध्यमातून भारतीय अन्न महामंडळाच्या साठ्यातून 4,60,122 एमटी गहू आणि 1690 एमटी तांदळाची उचल झाली आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या ओएमएसएस(डी) अर्थात देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेतून काल रोजी 4,60,122 एमटी गहू आणि 1690 एमटी तांदूळाची उचल करण्यात आली. गव्हाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने प्रत्येक पॅन कार्ड साठी 100मेट्रिक टन गव्हाच्या विक्रीची मर्यादा घालून देण्यात आली आहे जेणेकरून दर स्थिरीकरणाचे लाभ खऱ्या ग्राहकांपर्यंत पोहोचतील.
दिनांक 28 जून 2023 रोजी एफसीआय अर्थात भारतीय अन्न महामंडळाच्या साठ्यातील गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठीचा लिलाव सुरु झाला. आतापर्यंत गव्हाच्या विक्रीसाठीचे 21 आणि तांदळाच्या विक्रीसाठीचे 17 लिलाव झाले आहेत. या लिलावाच्या माध्यमातून 8,30,910 एमटी गहू आणि 12,09,760 एमटी तांदूळ खुला करण्यात आला असून सरासरी योग्य दर्जाचा गहू 2150 रुपये क्विंटल या राखीव दराने तर वैशिष्ट्यांच्या अटी शिथिल केलेला गहू 2125 रुपये क्विंटल दराने आहे. त्याचप्रमाणे पोषणयुक्त तांदूळ 2973 रुपये क्विंटल दराने तर एफएक्यू तांदूळ 2900 रुपये क्विंटल दराने देऊ करण्यात आला आहे.
देशांतर्गत खुल्या बाजारातील विक्री योजनेच्या [ओएमएसएस(डी)] माध्यमातून गहू आणि तांदळाच्या विक्रीसाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दिलेल्या मान्यतेनुसार, गिरण्या, धान्यांवर प्रक्रिया करणारे तसेच गव्हापासून इतर उत्पादनांची निर्मिती करणारे यांना ई-लिलावाच्या माध्यमातून केंद्राच्या साठ्यातून 50 लाख मेट्रिक टन गहू उपलब्ध करून देण्यासाठी त्याचप्रमाणे, ओएमएसएस(डी) च्या माध्यमातून25 लाख मेट्रिक टन तांदळासाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे.
SL/KA/SL
20 Nov. 2023