उध्दव ठाकरे यांची जादू कधीच नव्हती …

 उध्दव ठाकरे यांची जादू कधीच नव्हती …

कोल्हापूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उद्धव ठाकरे यांची जादू कधीच नव्हती.जादू केवळ बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. बाळासाहेब ठाकरे यांची जादू खतम करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षानं अयशस्वी खटाटोप केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांची जादू आजपर्यंत शाश्वत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

व्यासपीठावरून केवळ इशारे न करता राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी फारकत घेऊन वीर सावरकरांच्या बद्दल उद्धव ठाकरेंनी आपली स्पष्ट भूमिका मांडावी, असं आव्हानही त्यांनी यावेळी केलं.

नजिकच्या काळात मुंबईच्या हवेचं शुद्धीकरण आणि राज्यातील नद्यांच्या पाण्याचं शुद्धीकरण यावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आहे.त्यानुसार शासनानं ठोस पावलं उचलली असल्याचं दीपक केसरकर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांना सांगितलं.

कोल्हापूरचा ही विकास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचं वैभव महाराणी ताराराणी यांनी टिकवलं आणि त्यावर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यावर कळस चढवला. राजर्षी शाहू महाराजांची वैभवशाली परंपरा जोपासणं हे कर्तव्य असून त्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

कोल्हापुरला आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनविण्याचं नियोजन असून या नगरीच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य शासन कटिबद्ध असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

कोल्हापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, उन्हाळ्यातही (मे महिन्यातही) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा तसंच जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी राज्य शासन एक प्रकल्प राबवित आहे. शुद्धीकरण आदी संदर्भात आज मुंबईत पर्यावरण विभागाची बैठक बोलावण्यात आली असल्याचंही ते म्हणाले.

राजर्षी शाहू छत्रपती मिल, शाहू खासबाग कुस्ती मैदान, जुन्या पुराण्या तालमींचा कायापालट, पंचगंगा घाट सौंदर्यीकरण, रंकाळा तलाव विकास, हेरिटेज स्ट्रीट आदी कामंही लवकरच पूर्ण करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं.

ML/KA/SL

5 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *