पारंपरिक खेळणी उद्योगांच्या स्वयंपूर्णतेने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार

 पारंपरिक खेळणी उद्योगांच्या स्वयंपूर्णतेने देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पारंपरिक खेळणी उद्योगाला (traditional toy industry) चालना देण्यासाठी लाकडी खेळण्यांना (Wooden toys) जागतिक व्यासपीठ देण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भर दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी एकाच बाणात दोन लक्ष्य साध्य केली आहेत. पारंपरिक खेळण्यांचा उद्योग स्वावलंबी झाला तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत तर होईलच शिवाय चीनसाठी तो मोठा धक्का असेल. देशातील खेळण्यांचा बाजार सध्या 1.7 अब्ज डॉलरचा आहे. 1.2 अब्ज डॉलर किंमतीची खेळणी आयात केली जातात, त्यातील बहुतांश चीनकडून मागवली जातात.
खेळणी उद्योगाशी (toy industry) संबंधित मुख्य गोष्टी
जगभरात खेळण्यांचा व्यवसाय 6,624 अब्ज कोटी रुपयांचा आहे.
भारतात 125 अब्जांहून अधिक व्यवसाय होतो.
88 अब्जाहून अधिक खेळणी आयात केली जातात.
85 टक्के खेळणी चीनमधून येतात, 15 टक्के मलेशिया, जर्मनी, हाँगकाँग आणि अमेरिका मधून मागवली जातात.
चीन 1,472 अब्ज रुपयांची खेळणी निर्यात करतो.
जागतिक खेळणी उद्योगात भारताची हिस्सेदारी 0.5 टक्के.
देशात 4,000 हून अधिक खेळणी उत्पादन उद्योग आहेत.
देशात खेळणी बनवणारे चार हजाराहून अधिक उद्योग आहेत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांतर्गत येणार्‍या या उद्योगांपैकी 90 टक्के असंघटित आहेत आणि हीच त्यांची आणि देशाची सर्वात मोठी कमजोरी आहे. एका अंदाजानुसार 2024 पर्यंत भारताचा खेळणी उद्योग 147-221 अब्ज रुपये होईल. जगभरात दरवर्षी खेळण्यांची मागणी सरासरी पाच टक्क्यांनी वाढत असताना, भारताच्या मागणीत 10-15 टक्के वाढ आहे.
निर्यातीबद्दल सांगायचे तर केवळ 18-20 अब्ज रुपयांची खेळणी निर्यात केली जातात. भारतात खेळणी उत्पादक असंघटित असताना खेळण्यांची गुणवत्ता देखील एक मोठे आव्हान आहे. उत्पादन खर्च अधिक असल्यामुळे भारतीय खेळणी आपल्या स्वत:च्याच बाजारात आयात झालेल्या खेळण्यांशी स्पर्धा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत खेळण्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे.
फार पूर्वीची गोष्ट नाही, 1990 च्या आसपास, देशाच्या पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत लाकडी खेळणी (Wooden toys) मोठ्या प्रमाणात विकली जायची. ती थोडी महाग होती, परंतु त्यांचे सौंदर्य मन मोहून टाकणारे असायचे. याचदरम्यान, स्वस्त आणि हलकी खेळणी भारतीय बाजारात दाखल झाली. लाकूड आणि नैसर्गिक रंगांच्या किंमती वाढू लागल्या. याचा परिणाम खेळणी उत्पादकांवर झाला. उत्पादन कमी होऊ लागले. कारागीर बेरोजगार होऊ लागले आणि पहाता पहाता 90 टक्के भारतीय बाजारपेठ आयात झालेल्या खेळण्यांनी भरुन गेली.
पंतप्रधान मोदींच्या या पुढाकाराने लाकडी खेळणी (Wooden toys) बनवणार्‍या हजारो कारागिरांमध्ये जुने दिवस परतण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. पण त्यासाठी हा उद्योग संघटित करावा लागेल. केवळ यांत्रिकीकरण करुन चालणार नाही, तर स्वस्त कच्च्या मालाचा पुरवठा आणि बाजारपेठेची व्यवस्थाही करावी लागेल. तेव्हाच लाकडांची खेळणी उद्योग चिनी खेळण्यांशी टक्कर घेऊन बाजारत आपला जम बसवू शकतील.
PL/KA/PL/1 FEB 2021
 
 

mmc

Related post