तर भारताचा जीडीपी 20 अब्ज डॉलरने वाढेल

 तर भारताचा जीडीपी 20 अब्ज डॉलरने वाढेल

मुंबई, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्पादन संबंधी प्रोत्साहन योजनेचा (पीएलआय) लाभ घेऊन जर भारत चीनकडून आयातीवरील (Imports From China) आपले अवलंबित्व 50 टक्क्यांनी कमी करू शकला तर तो त्याच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) 20 अब्ज डॉलरची वाढ होऊ शकेल. एसबीआय रिसर्चने मंगळवारी जारी केलेल्या इकोरॅप या अहवालात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अहवालानुसार 2020-21 मध्ये चीनसोबतची व्यापार तूट कमी करण्यात भारताला यश आले होते, मात्र भारताच्या एकूण वस्तूंच्या आयातीमध्ये चीनचा वाटा 16.5 टक्के दराने वाढत आहे. अहवालात म्हटले आहे की 2020-21 मध्ये चीनमधून करण्यात आलेल्या 65 अब्ज डॉलर आयातीमध्ये (Imports From China) सुमारे 39.5 अब्ज डॉलर किंमतीच्या वस्तू आणि उत्पादनांचा वाटा होता. कापड, कृषी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, औषधे आणि रासायनिक क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी भारताने पीएलआय योजना जाहीर केल्या आहेत.

अहवालात असे म्हटले आहे की जर पीएलआय योजनांमुळे आपण चीनमधून होणारी आयात (Imports From China) 20 टक्क्यांनी जरी कमी करू शकलो तर आपण आपला जीडीपी 8 अब्ज डॉलरने वाढवू. त्याच वेळी, जर चीनवरील आयात अवलंबित्वात 50 टक्के कपात झाली तर आपला जीडीपी 20 अब्ज डॉलरने वाढेल. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत भारताने चीनकडून 68 अब्ज डॉलर किंमतीची उत्पादने आयात केली आहेत.

If India could reduce its dependence on imports from China by 50 per cent by taking advantage of the Production Promotion Scheme (PLI), it could increase its gross domestic product (GDP) by 20 billion. This is according to a report released by SBI Research on Tuesday.

PL/KA/PL/16 FEB 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *