कोविडच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत आयात निर्यातीत वाढ

 कोविडच्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत आयात निर्यातीत वाढ

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जून तिमाहीच्या जीडीपी विकास दराच्या जबरदस्त आकडेवारीनंतर आता ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या (International Trade) आघाडीवर एक चांगली बातमी आली आहे. या ऑगस्टमध्ये कोविड असलेल्या वर्षाच्या आधी म्हणजेच 2019 च्या तुलनेत आयातीत 17.95 टक्के वाढ झाली आहे. निर्यातीबबात सांगायचे तर ऑगस्ट 2019 च्या तुलनेत त्यात 27.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. चांगली गोष्ट ही आहे की आयात (Import) आणि निर्यात (Export) दोन्ही कोविडच्या आधीच्या वर्षातील ऑगस्टच्या तुलनेत जास्त आहे. वाणिज्य मंत्रालयाने ही माहिती जारी केली आहे.

व्यापारी तूट वाढली परंतु 2019 इतकीच राहिली
The trade deficit widened but remained the same for 2019

ऑगस्टमध्ये निर्यात (Export) वार्षिक आधारे 45.17 टक्क्यांनी वाढून 33.14 अब्ज डॉलरवर गेली. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 22.83 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. आयातीत (Import) 51.47 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या ऑगस्टमध्ये 31.03 अब्ज डॉलरच्या आयातीच्या तुलनेत या ऑगस्टमध्ये आयात 47.01 अब्ज डॉलर होती. या महिन्यात 13.87 अब्ज डॉलरची व्यापारी तूट होती, जी गेल्या ऑगस्टमध्ये केवळ 8.2 अब्ज डॉलर होती. अशा प्रकारे, व्यापारी तूट ऑगस्टमध्ये वार्षिक 69.15 टक्क्यांनी वाढली, परंतु 2019 इतकीच राहिली.

एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान आयात 81.75 टक्क्यांनी वाढली, निर्यात 66.92 टक्क्यांनी वाढली
Between April and August, import grew by 81.75 per cent and export by 66.92 per cent

या आर्थिक वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर (International Trade) नजर टाकली तर या काळात निर्यात (Export) 163.67 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही 66.92 टक्के जास्त आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत एकूण 98.05 अब्ज डॉलरची निर्यात झाली होती. यावर्षी एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान आयातीत (Import) 81.75 टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत एकूण 219.54 अब्ज डॉलरची आयात झाली जी गेल्या वर्षी 120.79 अब्ज डॉलर होती.
Following the strong GDP growth figures for the June quarter, there is now good news on the international trade front in August. Imports have increased by 17.95 per cent in August this year as compared to the previous year, which was the year of Kovid. In terms of exports, it has increased by 27.50 per cent as compared to August 2019. This information has been released by the Ministry of Commerce.
PL/KA/PL/03 SEPT 2021

mmc

Related post