चैत्री एकादशीच्या सोहळ्यास पंढरपुरात तीन लाख भाविक

 चैत्री एकादशीच्या सोहळ्यास पंढरपुरात तीन लाख भाविक

पंढरपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठी नववर्षातील पंढरपूरची पहिलीच यात्रा अर्थात चैत्री एकादशीचा सोहळा पंढरपुरात रंगत आहे. आज पहाटे विठ्ठलाच्या नित्यपूजेन चैत्री एकादशीच्या सोहळ्याला सुरुवात झाली. एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरातील गर्भगृह हे सूर्यफुलांनी सजवण्यात आले होते. तर संपूर्ण मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट हा भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.Three lakh devotees in Pandharpur for the celebration of Chaitri Ekadashi

शंभू महादेव आणि विठूनामाचा गजर संपूर्ण पांढरी नगरीत दुमदुमत आहे. चैत्रीचा सोहळा हा शिव आणि वैष्णवांचा सोहळा म्हणून पाहिला जातो. पंढरी नगरी ही हरि- हरा नाही भेद अशी नगरी म्हणून परिचित आहे. आजच्या एकादशीच्या सोहळ्यादिवशी शिव – पार्वतीचा विवाह होतो.

म्हणून पंढरपूर येथे आज विठोबास उपवास असूनही पुरणपोळीचा नैवैद्य असतो.
तर भाविकांना मात्र उपवास आहे. हा एकादशीचा सोहळा सुमारे 3 लाख भाविकांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.

ML/KA/PGB
2 Apr. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *