जपानी पंतप्रधानांनी मोदींसह घेतला पाणीपुरीचा आस्वाद

 जपानी पंतप्रधानांनी मोदींसह घेतला पाणीपुरीचा आस्वाद

नवी दिल्ली, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान फुमियो किशिदा दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी किशिदा यांनी पंतप्रधान मोदींसोबत भारतीय पदार्थांचा आस्वाद घेतला. मोदी आणि किशिदा यांचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. यामध्ये जपानचे पंतप्रधान मोदी लस्सी बनवताना आणि पाणीपुरी खाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमधील आहे. मोदी आणि किशिदा उद्यानात फेरफटका मारला आणि लाकडी बाकांवर बसून गप्पाही मारल्या.

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी सोमवारी दिल्लीतील राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जपानचे पंतप्रधान म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना हिरोशिमा येथे होणाऱ्या G-7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आणि त्यांनी ते स्वीकारले आहे. तर मोदी म्हणाले की, किशिदा यांचे भारतात स्वागत आहे. गेल्या वर्षभरात मी त्यांना अनेकदा भेटलो. यादरम्यान मला दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल नेहमीच सकारात्मक वाटली. सर्वांना बरोबर घेऊन जाणे हेच आमचे ध्येय आहे.

पंतप्रधान मोदींनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांना ‘कदमवुड जाली बॉक्स’ म्हणजेच कदंब लाकडापासून बनवलेला बॉक्समध्ये चंदनाची बुद्ध मूर्ती भेट दिली. ही मूर्ती कर्नाटकातील चंदनाच्या लाकडापासून बनवण्यात आली आहे.

SL/KA/SL
21 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *