आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त पंतप्रधानांनी केले टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण

 आंतरराष्ट्रीय मिलेट वर्षानिमित्त पंतप्रधानांनी केले टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ग्लोबल मिलेट्स (भरड धान्ये) परिषदेचे उद्घाटन केले. दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन केंद्र (IARI) कॅम्पसमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष 2023 वर टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण केले. पंतप्रधानांनी बायर-सेलर मीट आणि प्रदर्शनाचेही उद्घाटन केले.

यावेळी पीएम मोदी म्हणाले की, भारताच्या प्रस्ताव आणि प्रयत्नांनंतरच संयुक्त राष्ट्राने 2023 हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केले आहे. जग आंतरराष्ट्रीय मिलेट्सचे वर्ष साजरे करत असताना भारत या मोहिमेचे नेतृत्व करत आहे. ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्स हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. अशा घटना केवळ जागतिक कल्याणासाठी आवश्यक नाहीत, तर जागतिक कल्याणात भारताच्या वाढत्या जबाबदारीचेही प्रतीक आहेत.

या कार्यक्रमात 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्स 19 मार्च रोजी संपेल. हे पाहता हे वर्ष भारतासाठी खूप महत्त्वाचे मानले जात आहे, कारण भारत 2023 मध्ये G20चे आयोजन करत आहे. सरकारने मिलेट्सलाही G20 बैठकीचा एक भाग बनवले आहे.

मिलेट (भरडधान्य) म्हणजे काय?

  • गहू-तांदूळ वगळता इतर ज्या धान्यांवरचं नैसर्गिक आवरण भरड करून काढल्यानंतर त्यांचा वापर आहारात करता येतो त्यांना भरडधान्य म्हणतात.
  • पूर्वी उखळ-मुसळ वापरून या प्रकारच्या धान्यांवरील कवच किंवा साळ, साल काढली जात असे. त्यानंतर दगडी जात्यावर दळून त्या भरडीचं पीठ केलं जाई. कालौघात उखळ-मुसळाच्या जागी पिठाच्या गिरण्या आल्या.
  • शेती क्षेत्रात आधुनिक संशोधनं आणि वेगवेगळ्या पिकांची सुधारित वाणंही आली. सुधारित वाणं येण्यापूर्वी भारतीय उपखंडात भरडधान्याचं सेवन मोठ्या प्रमाणावर होत असे.
  • ज्वारी, बाजरी, राळे, वरई, नाचणी, कोदो, राजगिरा, डेंगळी वगैरे तृणधान्यं भरडधान्यांच्या गटात मोडतात.
  • गहू-तांदुळात ग्लुटेन घटक असल्याने त्यांचा समावेश भरडधान्यांत करत नाहीत. कोणत्याही भरडधान्यात ग्लुटेन हा घटक नसतो.

SL/KA/SL

18 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *