रितेश देशमुखच्या राजा शिवाजी’चं पहिलंच गाणं रिलीज
मुंबई, दि. १५ : रितेश देशमुख दिग्दर्शिक, निर्मित ‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाचे पहिलं गाणं राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ आज रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं दोन दिवसांआधी रिलीज होणार होतं मात्र ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर गाण्याचं रिलीज थांबवण्यात आलं होतं. रितेश देशमुख आणि राजा शिवाजी सिनेमाच्या टीमनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती.
राजा शिवाजी अँथम ‘छत्रपती’ आज रिलीज करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी वारश्याला समर्पित असलेले हे गीत आहे. हे केवळ एक गाणे नसून शौर्य, अभिमान आणि इतिहासाचा भव्य संगम आहे.
प्रख्यात संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या या मराठी आणि हिंदी भाषिय आवृत्ती साठी अजय गोगावले यांच्या दमदार आणि भावस्पर्शी आवाजाची जोड लाभली आहे. आणि महत्वाचं म्हणजे हिंदी गाणं शब्दबद्ध केलं आहे नामांकित गीतकार मनोज मुंतशिर यांनी, जे आजच्या भारतीय अस्मितेचं एक प्रतिक ठरणार आहे. तब्बल 80 गायकांच्या समूहाने हे गीत गायलं आहे. गाण्याचं नृत्यदिग्दर्शन रेमो डिसूझानं केलं आहे.
SL/ML/SL