आंजर्ले येथील सुप्रसिद्ध गणपती मंदीरात दरोडा

 आंजर्ले येथील सुप्रसिद्ध गणपती मंदीरात दरोडा

दापोली, दि. १५ : दापोली तालुक्यातील आंजर्ले येथे ऐतिहासिक वारसा असलेले कडावरचा गणपती मंदिर अज्ञाताने फोडून सुमारे 90 हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. कड्यावरच्या या गणपती मंदिरात चार अनोळखी इसमानी प्रवेश करून त्यापैकी तीन चोरट्यांनी त्याच्याकडे असणाऱ्या पहार सदृश्य हत्याराने गणपती मंदिराचे दर्शनी दरवाजाचे कुलूप व कडी कोंडा तोडून त्याद्वारे मंदिरात प्रवेश केला.

मंदिराच्या वरच्या सभा मंडपातील स्टीलची दानपेटी उचलून नेऊन सदरची दानपेटी शिव मंदिराच्या समोर असलेल्या त्रिपुराच्या पाठीमागे असणाऱ्या बुरुजच्या खाली नेऊन तेथे ती फोडली. चारही अज्ञात चोरट्यांच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटेच्या शांततेचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि अवघ्या काही मिनिटांत दानपेटी पळवून नेली. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सर्व प्रकार पहाटे 2 वाजून 21 मिनिटांनी सुरू झाला. चोरट्यांनी मंदिराच्या आवारात संशयास्पद हालचाली करत प्रवेश मिळवला. अत्यंत सराईतपणे त्यांनी दानपेटीवर डल्ला मारला आणि 2 वाजून 42 मिनिटांनी ते तिथून पसार झाले.


सकाळी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. दानपेटी गायब असल्याचे पाहताच ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता, त्यामध्ये काही संशयित चेहरे कैद झाले आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संशयितांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आलं आहे. संबंधित व्यक्ती कुठंही दिसल्यास बीट अंमलदार मोहिते तसेच स्थानिक पोलीस पाटील यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *