उष्णतेच्या लाटेमुळे या जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी
पुणे, दि. १५ : राज्याच्या विविध भागांत तापमानाने चाळीशी ओलांडली असून, पुढील 3 दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, वर्धा जिल्ह्याला १५ एप्रिल रोजी यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. वर्ध्यात उष्मालाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वर्ध्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. भारतीय हवामान विभागानुसार, १६ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्याचं तापमान ४३ ते ४५ अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
वर्धा जिल्ह्यात उष्मालाटेचा गंभीर इशारा देण्यात आला असून तापमान 43 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच सरकारी, खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना 16 एप्रिल, गुरुवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या यल्लो अलर्टच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
SL/ML/SL