न्यायालयाने फेटाळले राहुल गांधींचे अपील

 न्यायालयाने फेटाळले राहुल गांधींचे अपील

सुरत, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची याचिका सूरत कोर्टने फेटाळून लावली आहे. मोदी आडनावावरून केलेल्या टिका केल्या प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली होती. न्यायालयाकडून मिळालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, याकरता राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात राहुल गांधींना दिलासा देण्यास कोर्टाने नकार दिला.

सूरतच्या सत्र न्यायालायने काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना २३ मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यामुळे राहुल गांधी यांचं संसदेतील सदस्यत्वही रद्द झालं. खासदारी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी या शिक्षेप्रकरणी सुरत कोर्टात आव्हान दिलं. परंतु, सुरत कोर्टाने त्यांची याचिकाच फेटाळून लावली आहे. राहुल गांधी आता याप्रकरणी उच्च न्यायालयात जाऊ शकतात.

शिक्षेचे कारण
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर होते. कोलार येथील एक सभेत बोलताना ‘सर्व चोरांची आडनावं मोदी कशी काय असतात?’ असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला. या वक्तव्यावरून भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करत राहुल गांधींनी संपूर्ण मोदी समुदायाचा अपमान केल्याचं म्हटलं होतं.

जयराम रमेश यांचं महत्त्वाचं ट्विट
कोर्टाने याचिका फेटाळताच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश यांनी ट्वीट केलं आहे. कायद्याच्या चौकटीत असलेले सर्व पर्यायांचा आम्ही वापर करणार आहोत.

SL/KA/SL

20 April 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *