दोन लाख लोकांना मिळाला रोजगार

 दोन लाख लोकांना मिळाला रोजगार

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजेच जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत दोन लाख लोकांना नोकऱ्या (jobs) मिळाल्या आहेत. केंद्रीय कामगार मंत्रालयाने आपल्या त्रैमासिक सर्वेक्षण अहवालात (survey report) हा दावा केला आहे. कामगार मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणानुसार, जुलै-सप्टेंबर 2021 तिमाहीत नऊ निवडक क्षेत्रांमधून एकूण रोजगार निर्मिती 3.10 कोटी होती, जी एप्रिल-जून तिमाहीपेक्षा दोन लाख अधिक आहे.

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी जाहीर केलेल्या अहवालात (survey report) एप्रिल ते जून या तिमाहीत निवडक नऊ क्षेत्रांमध्ये एकूण 3.08 कोटी रोजगार (jobs) असल्याचे म्हटले आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत त्यात दोन लाखांनी वाढ होऊन ती 3.10 कोटी झाली आहे.

अहवालात म्हटले आहे की, एप्रिल 2021 मध्ये दुसऱ्या कोरोना लाटेदरम्यान लादण्यात आलेले निर्बंध हटवल्यानंतर आर्थिक घडामोडींमध्ये सुधारणा झाल्याचे या वाढीवरून सिद्ध होते. ही नऊ क्षेत्रे म्हणजे उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, रेस्टॉरंट, आयटी-बीपीओ आणि आर्थिक सेवा. यातील बहुतांश संस्था बिगर कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत.

या मालिकेतील हा दुसरा अहवाल (survey report) आहे. पहिला अहवाल एप्रिल-जून 2021 या तिमाहीसाठी होता. यामध्ये 10 किंवा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांचा समावेश आहे. अहवाल जाहीर करताना केंद्रीय मंत्री यादव म्हणाले की, या अभ्यासामुळे सरकारला मदत होईल. भारत लवकरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून सावरेल, अशी आशा यादव यांनी व्यक्त केली.

In the second quarter of the current financial year, from July to September 2021, two lakh people got jobs. The Union Ministry of Labor has made this claim in its quarterly survey report. According to the quarterly employment survey released by the Ministry of Labor on Monday, the total employment generation in the nine selected sectors in the July-September 2021 quarter was 3.10 crore, which is two lakh more than the April-June quarter.

PL/KA/PL/11 JAN 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *