जुलैमध्ये 1.6 कोटी लोकांना मिळाल्या नोकऱ्या

 जुलैमध्ये 1.6 कोटी लोकांना मिळाल्या नोकऱ्या

मुंबई, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रोजगाराच्या (Employment) दृष्टीने जुलै महिना चांगला होता. दिल्लीस्थित थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) (CMIE) नुसार, जुलैमध्ये 1.6 कोटी नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्याचबरोबर जूनच्या तुलनेत पगारदार कर्मचार्‍यांची संख्या 32 लाखांनी कमी झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, जुलै 2021 मध्ये कृषी क्षेत्रात 1.12 कोटी नोकऱ्या मिळाल्या. बांधकाम क्षेत्रात 54 लाख, सेवा क्षेत्रात 5 लाख आणि उत्पादन क्षेत्रात 8 लाख रोजगार प्राप्त झाले.

कृषी आणि बांधकाम क्षेत्रात रोजगार वाढला
Employment in agriculture and construction increased

सीएमआयईने (CMIE) सांगितले की, जुलैमध्ये शेती आणि बांधकाम कार्यात काम करणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे. तथापि, हे सर्व प्रकारच्या कामात सर्वात निम्न स्तराचे काम आहे, जे कृषी क्षेत्रात तात्पुरते असते. यापैकी बहुतांश असंघटित रोजगार (Employment) आहेत. दुसरीकडे, जुलैमध्ये पगारदार कर्मचार्‍यांची संख्या 7.65 कोटी झाली, जी जूनमधील एकूण आकडेवारीपेक्षा 32 लाख कमी आहे. जुलैचा हा आकडा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या आधीच्या आकडेवारीपेक्षा 36 लाखांनी कमी आहे.

पगारदार कर्मचार्‍यांची संख्या कोविडपूर्व स्तरापेक्षा एक कोटीने कमी झाली
The number of salaried employees is one crore less than the previous level

जानेवारी ते मार्च 2021 मध्ये पगारदार कर्मचार्‍यांची संख्या 8 कोटी होती. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेपूर्वी त्यांची संख्या 8.7 कोटी होती. या दृष्टीने, जुलै 2021 मध्ये पगारदार कर्मचार्‍यांची संख्या कोविडपूर्व स्तरावरून एक कोटीने कमी झाली आहे. याचे सर्वात मोठे कारण देशभरात लावण्यात आलेली कडक टाळेबंदी असल्याचे मानले जाते.

जुलैमध्ये बेरोजगारीचा दर 6.95 टक्के
The unemployment rate in July was 6.95 per cent

सीएमआयईच्या (CMIE) मते, जुलैमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 6.95 टक्के होता. यामध्ये शहरी बेरोजगारीचा दर 8.30 टक्के आणि ग्रामीण बेरोजगारीचा दर 6.34 टक्के होता. या काळात, हरियाणामध्ये सर्वाधिक 28.1 टक्के दर होता.
July was a good month for employment. According to the Delhi-based think tank Center for Monitoring Indian Economy (CMIE), 1.6 crore jobs were created in July. At the same time, the number of salaried employees has decreased by 32 lakh as compared to June. According to the latest figures, 1.12 crore jobs were created in the agriculture sector in July 2021. 54 lakh in the construction sector, 5 lakh in the service sector and 8 lakh in the manufacturing sector.
PL/KA/PL/10 AUG 2021
 

mmc

Related post