डिसेंबरमध्ये देशातील बेरोजगारी वाढली

 डिसेंबरमध्ये देशातील बेरोजगारी वाढली

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान देशात पुन्हा बेरोजगारी वाढू लागली आहे. थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या खासगी संस्थेच्या अहवालानुसार, डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर (unemployment rate) 7.9 टक्के होता, जो नोव्हेंबर (7.0 टक्के) पेक्षा जास्त आहे. संस्थेच्या मते, हा बेरोजगारीचा दर ऑगस्ट 2021 (8.3 टक्के) नंतरचा सर्वात जास्त आहे.

थिंक टँक सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (CMIE) ताज्या आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर (unemployment rate) 9.3 टक्क्यांवर पोहोचला. नोव्हेंबरमध्ये तो 8.2 टक्के होता. ग्रामीण बेरोजगारीचा दरही डिसेंबरमध्ये वाढून 7.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. अनेक अर्थशास्त्रज्ञांना काळजी वाटत आहे की ओमायक्रॉन गेल्या तिमाहीत दिसून आलेल्या आर्थिक सुधारणांसाठी नुकसानकारक ठरू शकतो.

राज्यांबद्दल बोलायचे तर, डिसेंबरमध्ये सर्वाधिक बेरोजगारी दर (unemployment rate) हरियाणामध्ये 34.1 टक्के होता. त्यानंतर राजस्थान 27.1 टक्के, झारखंड 17.3 टक्के, बिहार 16 टक्के आणि जम्मू आणि काश्मीर मध्ये तो 15 टक्के होता. राजधानी दिल्लीबद्दल बोलायचे तर डिसेंबरमध्ये त्याठिकाणी बेरोजगारीचा दर 9.8 टक्के होता.

सीएमआयईच्या (CMIE) मते, मे 2021 मध्ये बेरोजगारीचा दर 11.84 टक्के वर पोहोचला होता. यानंतर त्यात घसरण दिसली आणि सप्टेंबरमध्ये तो 6.86 टक्क्यांवर आला, परंतू आता त्यात पुन्हा वाढ होत आहे.

सीएमआयई (CMIE) च्या मते, बेरोजगारीचा दर भारतीय अर्थव्यवस्थेचे आरोग्य अचूकपणे दर्शवतो, कारण देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये किती बेरोजगार आहेत हे तो सांगतो. रब्बी पिकाच्या पेरणीच्या सुरुवातीला तेजीची अपेक्षा आहे. याचा अर्थ चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्र पुन्हा एकदा चांगली कामगिरी करेल. त्यामुळे स्थलांतरित मजूर शेतीकडे परततील.

डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.9 इतका असण्याचा अर्थ हा आहे की काम करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक 1000 पैकी 79 जणांना काम मिळालेले नाही. सीएमआयई दर महिन्याला 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करते आणि त्यांच्या रोजगाराची स्थिती जाणून घेते. महिनाभर सुरु रहाणार्‍या या सर्वेक्षणात विविध शहरांतील 32,166 घरांतील 105,025 हून अधिक व्यक्तींशी संवाद साधला जातो. त्यानंतर मिळालेल्या निष्कर्षांवरून अहवाल तयार केला जातो.

Unemployment is on the rise again in the country during the third wave of Corona. According to a report by think tank Center for Monitoring Indian Economy (CMIE), the unemployment rate was 7.9 per cent in December, higher than in November (7.0 per cent). According to the organization, this is the highest unemployment rate since August 2021 (8.3 percent).

PL/KA/PL/04 JAN 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *