संघटित क्षेत्रातील नोकर्‍यांमध्ये झाली वाढ

 संघटित क्षेत्रातील नोकर्‍यांमध्ये झाली वाढ

नवी दिल्ली, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संघटित क्षेत्रातील नोकऱ्या गेल्या सात वर्षांत सरासरी सुमारे 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जाहीर झालेल्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणानुसार (Quarterly employment survey) जून तिमाहीत उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, निवास आणि हॉटेल, आयटी/बीपीओ आणि आर्थिक सेवा क्षेत्रात एकूण 3.08 कोटी कर्मचारी होते.

संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांची एकूण संख्या 29 टक्क्यांनी वाढली
total number of employees in the organized sector has increased by 29 per cent

सहाव्या आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या नऊ संघटित क्षेत्रांमध्ये 2.37 कोटी कर्मचारी असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्या सर्वेक्षणात जानेवारी 2013 ते एप्रिल 2014 या कालावधीतील आकडेवारी समाविष्ट करण्यात आली होती. त्यानुसार, गेल्या सात वर्षांत संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांच्या एकूण संख्येत 29 टक्के वाढ झाली आहे.

27 टक्के कंपन्यांमध्ये कपात
reduction in 27 percent companies

रोजगार सर्वेक्षणात 25 मार्च ते 30 जून 2020 दरम्यान कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान सुमारे 27 टक्के कंपन्यांमध्ये कपात करण्यात आली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या साथीच्या प्रतिबंधासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदी दरम्यान सर्वात चांगली गोष्ट म्हणजे 81 टक्के कर्मचार्‍यांना पूर्ण पगार मिळाला.

आरोग्य आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील 90 टक्के कर्मचार्‍यांना पूर्ण पगार
Full pay for 90 percent of health and financial services employees

टाळेबंदी दरम्यान, 16 टक्के कर्मचार्‍यांना कमी झालेल्या पगारावर समाधान मानावे लागले, तर सुमारे तीन टक्के कर्मचार्‍यांचे हात रिक्तच राहिले. या दरम्यान, बांधकाम क्षेत्रातील 27 टक्के कामगारांना कमी वेतनावर काम करावे लागले, तर 9 टक्के कामगारांना त्यांचे वेतन मिळाले नाही. आरोग्य आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त कामगारांना त्यांचा पूर्ण पगार मिळाला.

नवीन त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण सुरू
New quarterly employment survey launched

केंद्रीय कामगार मंत्री भूपेंदर यादव यांनी नवीन त्रैमासिक रोजगार सर्वेक्षण (Quarterly employment survey) सुरू केले. जुने तिमाही रोजगार सर्वेक्षण तीन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 मध्ये निलंबित करण्यात आले होते. नवीन त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणात आर्थिक सेवा हे आणखी एक क्षेत्र जोडण्यात आले आहे.

महिला कर्मचार्‍यांची टक्केवारी 31 टक्क्यांवरुन 29 टक्क्यांवर आली

नवीन त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणात (Quarterly employment survey) काही मनोरंजक आकडेवारी समोर आली आहे. या वर्षीच्या जून तिमाहीत एकूण कर्मचार्‍यांमध्ये महिला कामगारांची टक्केवारी 29 टक्के होती. सहाव्या आर्थिक सर्वेक्षणादरम्यान हा आकडा 31 टक्के होता. नऊ आर्थिक क्षेत्रात एकूण 88 टक्के नियमित कामगार आणि 2 टक्के हंगामी कामगार होते, परंतु बांधकाम क्षेत्रात 13 हंगामी आणि 18 टक्के कंत्राटी कामगार होते.

वेतनपटाची आकडेवारी आणि त्रैमासिक सर्वेक्षण यामध्ये मोठा फरक
The percentage of female employees has come down from 31 per cent to 29 per cent

2017 मधील सप्टेंबर तिमाहीचा लेबर ब्युरोचा सातवा अहवाल मार्च 2018 मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सरकारने तिमाही सर्वेक्षण अहवाल देणे बंद केले. त्यांच्या मते, वेतनपट आकडेवारी आणि तिमाही रोजगार सर्वेक्षण आकडेवारी यात खूप फरक होता, त्यामुळे सरकारने असे केले. एप्रिल 2018 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) चा मासिक वेतनपट आकडेवारी जाहीर केली जात आहे.
Jobs in the organized sector have grown by an average of about 4 percent over the past seven years. According to the Quarterly Employment Survey, there were 3.08 crore employees in manufacturing, construction, trade, transportation, education, health, housing and hotels, IT / BPO and financial services in the June quarter.
PL/KA/PL/28 SEPT 2021
 

mmc

Related post