स्टॉक मार्केट consolidation च्या मूड मध्ये.
मुंबई, दि. 02 ( जितेश सावंत ) : गेला संपूर्ण आठवडा बाजार कन्सॉलिडेशनच्या मूड मध्ये दिसला. रुपयाची विक्रमी घसरण, सतत FII ची विक्री,जून महिन्याची उत्तम वाहन विक्री संख्या, सेकंड हायएस्ट मंथली जीएसटी (GST) कलेक्शन,मान्सूनची स्थिर प्रगती, क्रूडमधील घसरण,चीनमधील कोविड-१९ शिथिल झालेले निर्बंध यासारख्या मिश्र गोष्टींमुळे बाजार किरकोळ नफ्यासह बंद झाला. रुपयातील घसरण हि चिंतेची बाब आहे.stock market consolidation.
जून महिन्यात बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाली,याच महिन्यात FPI ने ५०,२०३ करोड रुपये बाजरातून काढून घेतले.विदेशी गुंतवणूकदारानी भारतीय बाजार जेव्हा ऑल टाईम हाय झाला तेव्हापासून विक्रीला सुरुवात केली.त्याचप्रमाणे व्याजदर वाढ,US FED चा निर्णय,रशियाने युक्रेन वर पुन्हा केलेले आक्रमण,जागतिक महागाई ह्या कारणांमुळे सुद्धा त्यांनी विक्री केली.
गुंतवणूकदारांचे लक्ष सॊमवारी bajaj auto buyback, शुक्रवारी ८ जुलै TCS Q1 results,USA June job data या कडे असेल. सोमवारी अमेरिकन बाजार बंद राहतील.
मार्केटमध्ये ऑल टाईम हाय वरून १५ % घसरण झाली आहे. गेले आठ महिने मार्केटमध्ये प्रचंड चढ उतार पाहावयास मिळाले आहे. गुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षा सध्या सुरु आहे. बाजार हा कायम लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरला आहे. अमेरिकन बाजारात सुद्धा अस्थिरता आहे. येणाऱ्या काळात ज्यावेळेस संधी मिळेल तेंव्हा गुंतवणूकदारानी लॉन्ग टर्म करीता इन्व्हेस्टमेंट करावी.
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी. Market ends higher for third day
सकारात्मक कामकाजाने आठवड्याची सुरुवात झाली. मजबूत जागतिक संकेत, तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि आयटी आणि धातू समभागांमध्ये झालेली खरेदी यामुळे आठवड्याची सुरुवात जोरदार झाली. जागतिक बाजारपेठेतील बढत ,मान्सूनची स्थिर प्रगती, क्रूडमधील घसरण आणि धातूच्या किमतीत झालेली घसरण, यामुळे आर्थिक वर्ष २३ च्या उत्तरार्धात देशांतर्गत महागाई कमी होण्याची आशा वाढल्याने बाजारात तेजी पसरली.चीनमधील कोविड-१९ निर्बंध शिथिल झाल्यामुळे जागतिक बाजारातील भावना शांत होण्यास मदत झाली. सेन्सेक्सने जवळपास ६०० अंकांची उसळी घेतली.BSE मधील सगळी सेक्टर तेजीत बंद झाली. स्मालकॅप आणि मिडकॅप समभागात सुद्धा खरेदीचा ओघ होता. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ४३३ अंकांनी वधारून ५३,१६१ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १३२ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १५,८३२ चा बंददिला.
अस्थिरतेमुळे बाजाराचा सपाट बंद. Market ends flat
दिवसभरातील चढउतारानंतर बाजाराने मंगळवारी सपाट बंद दिला. बाजाराची सुरुवात कमजोरीने झाली परंतु ऑटो, मेटल ,तेल आणि वायू समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजार सावरला.रुपयाने नीचांकी पातळी गाठल्याने निर्यात करणाऱ्या कंपन्यांमध्ये निवडक खरेदी दिसून आली.तसेच जीएसटी कौन्सिलची बैठक सुरू असल्याने मंगळवारचे सत्र रेंज-बाउंड होते.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १६ अंकांनी वधारून ५३,१७७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १८ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १५,८५० चा बंददिला.
बाजार घसरणीने बंद.Market closes in the red
मंथली एक्सपायरीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवारी बाजारात अस्थिरता जाणवली बाजारात घसरण झाली त्याबरोबर आठवड्याच्या शेवटी मंथली ऑटो सेल्स नंबर आणि पीएमआय डेटा असल्याने गुंतवणूकदार थोडे घाबरले व बाजारात विक्रीचा दबाव वाढला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १३४ अंकांनी घसरून ५३,०२७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ३२ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १५,७९९ चा बंददिला.
मंथली एक्सपायरीच्या दिवशी बाजारात अस्थिरता. Market ends flat on F&O expiry day
जून महिन्याच्या शेवटच्या दिवशी व मंथली एक्सपायरीच्या दिवशी बाजार प्रचंड अस्थिर होता.बाजारात बरेच चढ उतार जाणवले. मिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर,बाजाराची सुरुवात सपाट नोटेवर झाली आणि संपूर्ण सत्रात बुल्स आणि बेअर्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली, मेटल, ऑटो, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि पीएसयू बँक समभागांमध्ये विक्री दिसून आली.दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ८ अंकांनी घसरून ५३,०१८ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १८ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १५,७८०चा बंददिला.
जुलै सिरीजची सुरुवात कमकुवत
आठवडयाच्या शेवटच्या दिवशी जागतिक बाजारातील कमजोरीचा फटका भारतीय बाजाराला बसल्याने बाजाराच्या जुलै सिरीजची सुरुवात कमकुवत झाली. रुपयाने प्रथमच ७९ चा आकडा ओलांडून विक्रमी नीचांकी पातळी गाठली. त्याशिवाय,सरकारने तेल उत्पादकांवर विशेष कर लादल्याने गुंतवणूकदारांचे मन विचलित झाले. बाजार बंद होताना दिवसाच्या नीचांकीवरून सावरले जून महिन्याची उत्तम वाहन विक्री संख्या, रुपयाची घसरण,कमकुवत उत्पादनाचे आकडे,सेकंड हायएस्ट मंथली जीएसटी (GST) कलेक्शन यासारख्या मिश्र गोष्टींमुळे बाजार सपाट बंद झाला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १११ अंकांनी घसरून ५२,९०७ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २८ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १५,७५२ चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analysआहेत.)
JS/KA/PGB
2 July 2022