हंगामी मिरचीवर विषाणूजन्य संसर्ग , पीक संकटात…

 हंगामी मिरचीवर विषाणूजन्य संसर्ग , पीक संकटात…

औरंगाबाद, दि. 04 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील Kannada taluka of Aurangabad district चिंचोली परिसरात लागवड केलेल्या पूर्व हंगामी मिरचीवर विषाणू जण्य संसर्ग पसरला आहे. त्यात पावसाने दिलेल्या हुलकावणी मुळे मिरचीचे पीक संकटात सापडले आहे.Viral infection on seasonal chillies

त्यामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्याच्या विहिरींना थोडे फार पाणी होते अशा शेतकऱ्या च्या मिरच्या जगल्या तर काहींच्या पाण्या अभावी सुकल्याने शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मिरची पिकावर पावसाच्या अभावामुळे विषाणूजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील संपूर्ण मिरची क्षेत्र संकटात सापडल्याने शेतकरी हैराण झाले आहे.

ML/KA/PGB
4 July 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *