बाजाराचे लक्ष पुढील आठवडयातील रिझर्व्ह बँकेच्या(RBI Policy)पतधोरणाकडे 

 बाजाराचे लक्ष पुढील आठवडयातील रिझर्व्ह बँकेच्या(RBI Policy)पतधोरणाकडे 

मुंबई, दि. 4 (जितेश सावंत) : या आठवडयात भारतीय बाजारात चढ उतार पाहावयास मिळाले. पहिल्या दिवशीच्या तुफान तेजी नंतर आठवडयाचा शेवट सपाट झाला.यूएस फेडच्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीचे मिनिट्स,चीनद्वारे कोविड-संबंधित प्रतिबंधांमध्ये शिथिलता,देशात मान्सून लवकर सुरू झाल्याने या वर्षी बंपर पीक येण्याची आशा,युरोपियन युनियनने या वर्षाच्या अखेरीस रशियाकडून तेल आयातीमध्ये आणखी कपात करण्याची केलेली घोषणा,क्रूडच्या किमतीत झालेली वाढ,Q4 जीडीपी डेटा,महागाई,साप्ताहिक एक्स्पायरी,RBI च्या ताज्या अंदाजानुसार, FY23 मध्ये ग्रोथ मंदावण्याची चिन्हे,जीएसटी संकलन या सगळ्याचा प्रभाव या आठवडयात दिसून आला.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष सोमवारपासून सुरु होणाऱ्या RBI ची बैठक, बुधवारी व्याजदर संबंधीचा जाहीर होणार निर्णय,जपान,युरोपचे GDP आकडे,गुरुवारी वीकली एक्स्पायरी.शुक्रवारी US,CHINA चे रिटेल महागाईचे आकडे याकडे असेल.

पुढील आठवड्यात चलनविषयक धोरणाच्या नियोजित आढाव्यात रिझव्र्ह बँक आणखी 0.40 टक्के दरवाढ करेल,असे मत एका असे एका विदेशी ब्रोकिंग फर्मने मांडले.

तांत्रिकदृष्ट्या मागील आठवडयात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने १६,७००चा टप्पा पार केला.

सेन्सेक्स १,०४१ अंकांनी वधारला. Sensex rises 1,041 points

आठवडयाच्या पहिल्याच दिवशी बाजारात तुफान तेजी पसरली. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे बाजाराला बळ मिळाले. शुक्रवारी यूएस मार्केटमध्ये मोठी तेजी दिसून आली होती. यूएस फेडच्या चलनविषयक धोरणाच्या बैठकीचे मिनिट्स जाहीर झाले व त्यात यूएस अर्थव्यवस्थेतील प्रचलित ताकदीवर भर दिला. तसेच चीनद्वारे कोविड-संबंधित प्रतिबंधांमध्ये शिथिलता जाहीर केल्याने बाजारात जोश भरला.देशात मान्सून लवकर सुरू झाल्याने या वर्षी बंपर पीक येण्याची आशा निर्माण झाली आहे ज्यामुळे ग्रामीण मागणी वाढेल या आशेने बाजार वधारला. सेन्सेक्स जवळपास १२०० अंकांनी वाढला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १,०४१अंकांनी वधारून ५५,९२५ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ३०८ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १६,६६१ चा बंददिला.

निफ्टीने १६,६०० च्या खाली बंद दिला.Nifty ends below 16,600

मंगळवारच्या सत्राची सुरुवात थोडी नरमाईने झाली. आशियाई बाजारात तेजी असून देखील भारतीय निर्देशांकांनी त्यांची तीन दिवसांची विजयी मालिका खंडित केली. क्रूडच्या किमतीत झालेली वाढ आणि महागाईमुळे गुंतवणूकदारांनी इक्विटी मार्केटमधून दूर राहणे पसंत केले. युरोपियन युनियनने या वर्षाच्या अखेरीस रशियाकडून तेल आयातीमध्ये आणखी कपात करण्याची घोषणा केल्यानंतर क्रूडच्या किमती प्रति बॅरल $120 च्या पुढे गेल्या. देशांतर्गत बाजार रिकव्हरी मोडला धरून ठेवण्यात अयशस्वी ठरला कारण बाजाराला Q4 जीडीपी डेटा रिलीझ होण्याची प्रतीक्षा होती. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ३५९ अंकांनी घसरून ५५,५६६ वर बंद झाला.दुसरीकडे, निफ्टीत ७६ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १६,५८४ चा बंददिला.

बाजार घसरणीने बंद झाला. Market ends lower

बुधवारी अजून एका अस्थिर सत्रानंतर बाजार घसरणीने बंद झाला.मिश्र जागतिक संकेत तसेच FY23 मधील मंदावलेली वाढ आणि तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे बाजाराची चिंता वाढली.भारतीय अर्थव्यवस्थेने FY22 मध्ये 8.7 टक्के वाढ नोंदवली होती परंतु RBI च्या ताज्या अंदाजानुसार, FY23 मध्ये ती 7.2 टक्के कमी होण्याची अपेक्षा आहे. बुधवारी बाजारात JSW Steel, Coal India, HDFC Life, M&M, HDFC and Kotak Mahindra Bank या समभागांनी दमदार कामगिरी केली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १८५ अंकांनी घसरून ५५,३८१ वर बंद झाला.दुसरीकडे, निफ्टीत ६२ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १६,५२३ चा बंददिला.

 

साप्ताहिक एक्स्पायरीच्या दिवशी बाजार वधारला.Market gains on weekly expiry day

आदल्या दिवसाच्या अस्थिर सत्रानंतर गुरुवारी बाजारात तेजी पसरली. कच्च्या तेलाच्या तसेच गॅसच्या किमतीतील घसरणी मुळे बाजार चांगलाच वधारला. वाढत्या महागाईमुळे होणाऱ्या मंदीच्या भीतीने आशियाई बाजार नरम होते परंतु क्रूड प्रति बॅरल $120 वरून $113 वर घसरल्याने व उर्जेच्या किमतींमध्ये घसरण झाल्यामुळे भारतीय निर्देशांकांचा आत्मविश्वास बळावला सेन्सेक्स जवळपास ५०० अंकांनी वधारला. सलग चवथ्या वेळेला मासिक जीएसटी संकलनाने ₹1.40 लाखाचा आकडा पार केल्याने तसेच मे महिन्यातील वाहन विक्रीनेही बाजाराला बळ दिले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ४३६ अंकांनी वधारून ५५,८१८ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १०५ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १६,६२८ चा बंददिला.

बाजाराने दिवसभराचा नफा गमावून सपाट बंद दिला. Market squanders day’s gains to end flat

आठवडयाच्या शेवटच्या दिवशी दुपारनंतर बाजाराने सगळं नफा गमावला. यूएस मार्केट मधील टेस्ला आणि एनव्हीडियाच्या शेअर्सच्या जोरदार प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजार उच्च पातळीवर उघडला.परंतु देशात कोविडची रुग्णसंख्या तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याच्या बातमीने बाजारात नफा-वसुली झाली व दिवसाचा नफा नष्ट झाला. कमकुवत सिमेंट स्टॉक आणि कमकुवत यूएस पेरोल डेटाच्या चर्चेने देखील गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात पोझिशन्स घेऊन जाण्यापासून सावध केले. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ४८ अंकांनी घसरून ५५,७६९ वर बंद झाला.दुसरीकडे, निफ्टीत ४३ अंकांची घसरण होऊन निफ्टीने १६,५८४ चा बंददिला.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

4 Jun 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *