सेन्सेक्सने गाठले नवे विक्रमी शिखर.प्रथमच ५६,००० च्या पातळीवर दिला बंद.

 सेन्सेक्सने गाठले नवे विक्रमी शिखर.प्रथमच ५६,००० च्या पातळीवर दिला बंद.

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजाराने पुन्हा विक्रमी उच्चांक गाठला. बाजारावर जागतिक संकेत,ऑगस्ट महिन्याची F&O एक्सपायरी,Fed Reserve’s Jackson Hole Economic Symposium  मधील फेड चेअरमन  Jerome Powells यांची टिप्पणी,अमेरिका व चीन यांच्यातील वाढता तणाव,डेल्टा विषाणूच्या संसर्गात होत असलेली वाढ (Delta virus),अफगाणिस्तानातील काबुल शहरातील बॉम्ब स्फोट या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी व खालच्या स्तरावर दीर्घकाळाकरिता गुंतवणूक करावी.

आय.टी क्षेत्राच्या जोरावर मार्केटचा सकारात्मक बंद. Markets end on a positive note in the volatile session led by the IT stocks.

 आठवडयाच्या पहिल्याच दिवशी चांगल्या जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजाराची सुरुवात मजबूत झाली. रुपयाची सुरुवात देखील मजबूत झाली.परंतु दिवसभरात बाजारात थोडी नफावसुली झाली.परंतु बाजार बंद होताना सेन्सेक्स व निफ्टी हिरवे निशाण फडकवण्यात यशस्वी झाले. दिवसभरातील कामकाजात HCL Technologies, Nestle, TCS, Bajaj Finserv आणि Bharti Airtel  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व  Grasim Industries, Adani Ports, M&M, Eicher Motors  आणि  Bajaj Auto  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले.बाजार बंद होताना सेन्सेक्स २२६ अंकांनी वधारून ५५,५५५ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ४५अंकांनी वधारून १६,४९६चा बंद दिला.

बँकिंग आणि मेटल समभागांच्या जोरावर सेन्सेक्स व निफ्टीने दिला उच्चतम बंद भाव. Sensex, Nifty Close At Record Highs Led By Gains In Banking, Metal Shares

मजबूत ग्लोबल संकेतांमुळे मंगळवारी बाजाराची सुरुवात जोशपूर्ण झाली.अमेरिकन मार्केटमधे सुद्धा सोमवारी तेजीचे वातावरण होते Pfizer-BioNTech  च्या लसीला अंतिम मंजुरी मिळाल्याने तेथील बाजारात  जोश वाढला.भारतीय बाजारात मेटल ,ऑइल अँड गॅस ,बँकिंग, रिअल इस्टेट आणि फार्मा क्षेत्रात चांगलीच खरेदी झाली. Bajaj Finserv आणी Bajaj Finance मधील खरेदीमुळे सेन्सेक्सने दुपारी ५६,००० पातळी पुन्हा गाठली. Bajaj Finserv  हि कंपनी आता Mutual Fund च्या कारभारात उतरणार असल्याने व या कंपनीला सेबीने AMC साठी परवानगी दिल्याने हा समभाग दिवसभरातील कारभारात ९ % वाढला,16,590.15 चा सर्वाधिक उच्चांक नोंदवला.दिवसभरातील कामकाजात Bajaj Finserv, Adani Ports, Bajaj Finance, Tata Steel  आणि Hindalco Industries  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व  Britannia Industries, HDFC, Infosys, Asian Paints आणि Nestle  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले.बाजार बंद होताना सेन्सेक्स ४०३अंकांनी वधारून ५५,९५८ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १२८अंकांनी वधारून १६,६२४चा बंद दिला.

दिवसभरातील कामकाजात नवीन विक्रम स्थापित केल्यानंतर बाजाराने दिला सपाट बंद. Markets end on a flat note after hitting a fresh record high levels intraday.

बुधवारी बाजाराची सुरुवात बढत घेऊन झाली. दिवसभरातील कामकाजात बाजाराने म्हणजेच सेन्सेक्स व निफ्टीने नवीन विक्रम स्थापित केला. परंतु बाजारात वरच्या स्तरावर नफावसुली झाली व बाजार शेवटी सपाट बंद झाला. दिवसभरातील सत्रात मिडकॅप व स्मालकॅप समभागात खरेदीचा ओघ दिसला. परंतु लार्ज कॅप समभाग सुस्त होते.दिवसभरातील कामकाजात Adani Ports, HDFC Life, Hindalco, Coal India आणि ONGC ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व Bajaj Finserv, Titan Company, Maruti Suzuki, Bharti Airtel आणि JSW Steel  ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १४ अंकांनी घसरून  ५५,९४४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी१० अंकांनी घसरून १६,६३४चा बंद दिला.

ऑगस्ट महिन्याच्या F&O एक्सपायरीच्या दिवशी बाजार सपाट. Markets erased early gains and end on a flat note amid expiry day volatility.

गुरुवारी ऑगस्ट महिन्याच्या F&O एक्सपायरीच्या दिवशी बाजारात बरेच चढउतार दिसले. जागतिक बाजारातून देखील कमजोर संकेत होते.जागतिक गुतंवणूकदारांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या कॉन्फरन्सकडे होते (Fed Reserve’s Jackson Hole Economic Symposium) तसेच अमेरिका व चीन यांच्यातील वाढता तणाव व डेल्टा विषाणूच्या संसर्गात होत असलेली वाढ याकडे होते. बाजार बंद होताना सपाट बंद झाला.दिवसभरातील कामकाजात Britannia Industries, Tata Consumer Products, HDFC Life, BPCL आणिReliance Industries ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत अव्वल राहिले व Bharti Airtel, JSW Steel, Maruti Suzuki, Hindalco Industries आणि Power Grid   ह्या समभागांचे प्रदर्शन  निफ्टीत सुमार राहिले.बाजार बंद होताना सेन्सेक्स ४ अंकांनी वधारून   ५५,९४९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी२ अंकांनी वधारून १६,६३६चा बंद दिला.

सेन्सेक्स प्रथमच ५६,००० च्या पातळीवर दिला बंद भाव.Sensex Closes Above 56,000-Mark For The First Time. 

शुक्रवारी सप्टेंबर सिरीजच्या पहिल्याच दिवशी बाजाराची सुरुवात सपाट झाली. अफगाणिस्तानातील काबुल शहरातील बॉम्ब स्फोटानंतर जागतिक बाजार कमजोर होते.भारतीय बाजारात खालच्या स्तरावरून चांगली खरेदी झाली व त्यामुळे दिवसभरात बाजाराने नवीन उच्चांक गाठला निफ्टीने १६,७२२ चा विक्रमी स्तर पार केला.जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष Jackson Hole Economic Symposium च्या घोषणेकडे आहे. भारतीय बाजारात मात्र विदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा मारा सुरूच आहे..दिवसभरातील कामकाजात UltraTech Cement, Larsen & Toubro, Dr Reddy’s Labs, Bajaj Finserv आणि Sun Pharma ह्या समभागांचे प्रदर्शन  सेन्सेक्समध्ये  अव्वल राहिले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १७६ अंकांनी वधारून  ५६,१२४ या स्तरावर बंद झाला व निफ्टी ६८अंकांनी वधारून १६,७०५चा बंद दिला.

जितेश सावंत

शेअर बाजार तज्ञ,

Technical and Fundamental Analyst-Stock Market

jiteshsawant33@gmail.com  

ML/KA/PGB
28 Aug 2021

mmc

Related post