कोरोना लाटेतही राज्य सरकारांच्या उत्पन्नात 44.7 टक्क्यांची वाढ

 कोरोना लाटेतही राज्य सरकारांच्या उत्पन्नात 44.7 टक्क्यांची वाढ

मुंबई, दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोनाची दुसरी लाट असतानाही या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केवळ केंद्र सरकारच्याच उत्पन्नात वाढ झाली नाही, तर राज्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ (revenue increase) झालेली दिसून येत आहे. राज्यांवर होणार्‍या एकूण खर्चाच्या 76 टक्के हिस्सा असलेल्या देशातील 16 प्रमुख राज्यांचा कर महसूल गेल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) 44.7 टक्के वाढला आहे. राज्यांना सर्वात मोठा फायदा मुद्रांक शुल्क आणि नोंदणीमुळे झाला आहे.

ओडिशा वगळता सर्व राज्यांच्या उत्पन्नात वाढ
revenue increase of all states except Odisha

वित्तीय सेवा कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने केलेल्या एका विश्लेषणानुसार, ओडिशा वगळता सर्व राज्यांच्या उत्पन्नात वाढ (revenue increase) झाली आहे. गुजरात आणि पंजाबमध्ये 200 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. छत्तीसगड, हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणाने पहिल्या तिमाहीत त्यांच्या संपूर्ण वर्षाच्या वित्तीय तू्टीच्या लक्ष्याचा एक चतुर्थांश टप्पा गाठला आहे.

विश्लेषणामध्ये सहभागी राज्ये
States participating in the analysis

छत्तीसगड, गुजरात, हरियाणा, हिमाचल, झारखंड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, यूपी आणि उत्तराखंड.

उत्पन्न वाढले तसा खर्चही वाढला
As revenue increased, so did expenses

महसूल वाढीसोबतच (revenue increase) राज्यांचा खर्चही वाढला आहे. वर्षांच्या आधारावर राज्यांचा एकूण खर्च 18 टक्क्यांनी वाढला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 4.1 टक्क्यांनी ने कमी झाला होता. तथापि, या काळात भांडवली खर्चात 133.4 टक्क्यांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजेच राज्यांनी विकासकामांमध्ये भरपूर भांडवल खर्च केले आहे. या खर्चाचा परिणाम राज्यांच्या वित्तीय तूटीच्या स्वरूपात दिसून येत आहे. मात्र, झारखंड आणि ओडिशामध्ये ही वाढ दिसून आलेली नाही.

केंद्र आणि राज्यांचा महसूल 39 टक्क्यांनी कमी झाला होता
The revenue of the Center and the states had declined by 39 per cent

फायनान्शियल सर्विसेसचे मुख्य अर्थशातज्ञ निखिल गुप्ता यांनी निदर्शनास आणून दिले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या एकूण उत्पन्न गेल्या वर्षी 39 टक्क्यांनी घटले होते, आता वार्षिक आधारावर 115 टक्के अधिक आहे. मात्र केंद्र आणि राज्यांचा सामायिक खर्च केवळ 9.4 टक्क्यांनीच वाढला आहे. उत्पन्नापेक्षा कमी खर्चामुळे, एकूण सरकारी वित्तीय तूट गेल्या तिमाहीत 17.6 टक्के होती, जी गेल्या तीन वर्षांच्या सरासरी दर 44 टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे.
Despite the second wave of corona, the first quarter of this financial year has seen a significant increase not only in the revenue of the central government, but also in the revenue of the states. The tax revenue of 16 major states, which account for 76 per cent of the total expenditure on states, has increased by 44.7 per cent in the last quarter (April-June). States have benefited the most from stamp duty and registration.
PL/KA/PL/28 AUG 2021

mmc

Related post