Paytm च्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण

 Paytm च्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेअर बाजाराच्या व्यवहारात आज पेटीएमचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले आणि 317.15 रुपयांच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्समध्ये ही घसरण एका अहवालानंतर आली आहे, ज्यात असे म्हटले की आदित्य बिर्ला फायनान्ससह तिच्या अनेक कर्जदार भागीदारांनी दिलेली कर्ज हमी थांबवली आहे. त्यामुळे पेटीएमचे शेअर्स गेल्या 3 दिवसात 14% पेक्षा जास्त घसरले आहेत. तसेच पेटीएमचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत सुमारे 50 टक्क्यांनी घसरले आहेत. त्या तुलनेत निफ्टी निर्देशांक या काळात 3 टक्क्यांनी वाढला आहे.

अहवालात म्हटले आहे की आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेच्या व्यवसायावर बंदी घातल्यानंतर, आदित्य बिर्ला फायनान्स व्यतिरिक्त, पिरामल फायनान्स आणि क्लिक्स कॅपिटल सारख्या इतर कर्जदारांनीही पेटीएम बरोबरची भागीदारी थांबवली.
एप्रिलमध्ये, पेटीएमच्या प्लॅटफॉर्मद्वारे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) व्यवहार सलग तिसऱ्या महिन्यात घटले. एप्रिलमध्ये कंपनीच्या प्लॅटफॉर्मवरून 111.73 कोटी व्यवहार झाले, जे मागील महिन्यातील 123.04 कोटी व्यवहारांपेक्षा सुमारे 9 टक्के कमी आहे. युपीआयच्या बाबतीत कंपनीचा बाजार हिस्सा एप्रिलमध्ये 8.4 टक्क्यांवर घसरला, जो पूर्वी फेब्रुवारीमध्ये 10.8 टक्के आणि मार्चमध्ये 9.13 टक्के होता.

मोतीलाल ओसवाल येथील विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, पेटीएमचा निव्वळ तोटा आर्थिक वर्ष 2024 च्या मार्च तिमाहीत 470 कोटी रुपयांपर्यंत वाढू शकतो, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 170 कोटी रुपये होता. तसेच, विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे की कंपनीचा महसूल 22.5 टक्क्यांनी घसरून 1,830 कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2,340 कोटी रुपये होता.

SL/ML/SL

8 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *