अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीसाठी सेबीला मुदतवाढ

 अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी चौकशीसाठी सेबीला मुदतवाढ

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय उद्योग विश्वात खळबळ माजवणाऱ्या अदानी उद्योग समूहाबाबत हिडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालाने बाबत चौकशी करण्याची जबाबदारी सेबीकडे सोपवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज बाजार नियामक सेबीला अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. आता सेबीला 14 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे.

सुनावणीदरम्यान, सेबीची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी तपासासाठी सहा महिन्यांची मुदत मागितली. मात्र, खंडपीठाने सहा महिन्यांची मुदत देण्यास नकार दिला. खंडपीठाने सांगितले की ते “अनिश्चित काळासाठी मुदतवाढ” देऊ शकत नाही. आम्ही दोन महिन्यांची मुदत दिली होती आणि आता ती ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. म्हणजे सेबीला एकूण 5 महिन्यांचा वेळ मिळाला आहे.

दुसरीकडे, स्वतंत्र समितीने सादर केलेल्या तपास अहवालावर न्यायालयाने म्हटले की, अहवालाचे विश्लेषण करण्यासाठी वेळ हवा आहे. समितीचा अहवालही पक्षकारांना दिला जाणार आहे. या अहवालावर पुढील सुनावणी 11 जुलै रोजी होणार आहे. यावर सरन्यायाधीश डॉ. धनंजय यशवंत चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिंहा आणि जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

SL/KA/SL

17 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *