किशोर बियाणी यांच्या विरोधातील सेबीच्या आदेशांना सॅटची स्थगिती

 किशोर बियाणी यांच्या विरोधातील सेबीच्या आदेशांना सॅटची स्थगिती

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): फ्यूचर रिटेलचे (Future Retail) अध्यक्ष किशोर बियाणी (Kishor Biyani) आणि काही अन्य प्रवर्तकांवर प्रतिभूती बाजारात (securities market) निर्बंध घालण्याच्या बाजार नियामक सेबीच्या (Market regulator SEBI) आदेशांना प्रतिभूति अपीलीय न्यायाधिकरणाने (सॅट) (Securities Appellate Tribunal) स्थगिती दिली आहे. सॅटने फ्यूचर समुहाच्या प्रवर्तकांना अंतरिम उपाय म्हणून 11 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहे. बाजार नियामक भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (सेबी) बियाणी आणि अन्य प्रवर्तकांवर एका वर्षासाठी प्रतिभूती बाजारात भाग घेण्यास बंदी घातली होती.

अंतर्गत व्यवसायाचा आरोप

फ्यूचर कॉर्पोरेट रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेड (एफसीआरपीएल) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सॅट ने 15 फेब्रुवारी 2021 रोजी झालेल्या एका सुनावणीमध्ये सेबीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे, ज्यात फ्यूचर रिटेलच्या (Future Retail) समभागांच्या मार्च 2017 मध्ये झालेल्या खरेदी संदर्भात फ्युचर समुहाच्या प्रवर्तकांवर अंतर्गत व्यवसाय केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सॅट (SAT) आता या प्रकरणावर 12 एप्रिल 2021 रोजी सुनावणी करेल. एफसीआरपीएल ही बिगबाजार (Big Bazar) या प्रमुख कंपनीसह इझीडे क्लब आणि हेरिटेज फ्रेशचे संचालन करणार्‍या फ्यूचर रिटेलच्या प्रवर्तकांपैकी एक आहे. फ्यूचर रिटेलनेही सायंकाळी उशिरा शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेमध्ये ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की सॅटने प्रवर्तक आणि प्रवर्तक संस्थांच्या विरोधातील सेबीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. फ्यूचर रिटेलने सांगितले की सॅटच्या आदेशांच्या प्रतीची वाट पहात आहोत. न्यायाधिकरणाकडून आदेश अपलोड अथवा प्रकाशित झाल्यानंतर ते शेअर बाजाराला देखील दिले जातील.

17.78 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश होते

याआधी तीन फेब्रुवारीला सेबीने (SEBI) किशोर बियाणी आणि फ्यूचर रिटेल लिमिटेडच्या (Future Retail) काही इतर प्रवर्तकांना प्रतिभूती बाजारात एक वर्षासाठी बंदी घातली होती. याशिवाय नियामकाने किशोर बियाणी, अनिल बियाणी आणि फ्यूचर कॉर्पोरेट रिसोर्सवर प्रत्येकी एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यांना चुकीच्या पद्धतीने कमावलेला 17.78 कोटी रुपयांचा नफा जमा करण्यास देखील सांगण्यात आले होते.
PL/KA/PL/17 FEB 2021

mmc

Related post