देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो- अर्थतज्ज्ञ

 देशाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण होऊ शकतो- अर्थतज्ज्ञ

मुंबई, दि.23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी (SBI Economist) सांगितले आहे की गेल्यावर्षी जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय कंपन्यांचे बाजार भांडवल सर्वात वेगवान वाढले. मात्र या कालावधीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) घट झाली. यामुळे देशाच्या आर्थिक स्थैर्याला (financial stability) धोका निर्माण होऊ शकतो. भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले की किरकोळ गुंतवणूकदारांनी बाजारामध्ये बराच रस दाखवला आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या 1.42 कोटींनी वाढली आहे. त्याच वेळी एप्रिल आणि मेमध्ये त्यांची संख्या 44 लाखांनी वाढली.

लोक जास्त ट्रेडिंग करत आहेत
People are trading more

देशाच्या सर्वात मोठ्या बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी (SBI Economist) सांगितले की या काळात शेअर बाजारातील वाढ अन्य वित्तीय उत्पादनांवरील परतावा दर कमी असल्याच्या कारणामुळे झाली आहे. तसेच, जागतिक पातळीवर तरलता सुधारली आहे. त्याचबरोबर हालचालीवरील निर्बंधांमुळे लोक घरातच अधिक वेळ घालवत आहेत, यामुळे ते जास्त ट्रेडिंग करीत आहेत. बीएसईचा 30 समभागांचा सेन्सेक्स एप्रिल 2020 मध्ये 28,000 होता जो सध्या 52,000 च्या पातळीच्या वर आहे.

आर्थिक स्थैर्याचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो
The issue of financial stability may be present

भारतीय स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांनी (SBI Economist) म्हटले आहे की, वास्तविक अर्थव्यवस्थेत कोणतीही महत्त्वपूर्ण घडामोडी होत नसताना शेअर बाजारात होत असलेल्या वाढीमुळे आर्थिक स्थैर्याचा (financial stability) मुद्दा उपस्थित होऊ शकतो. आपल्या आर्थिक स्थैर्य निर्देशांकानुसार, एप्रिल 2021 मध्ये त्यात सर्वात कमी सुधारणा झाली आहे.
याठिकाणी हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी रिझर्व्ह बँकेने शेअर बाजारातील जोरदार तेजीमुळे आर्थिक स्थैर्याच्या (financial stability) धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. गेल्या वर्षी बीएसई मध्ये 1.8 पट वाढ झाली, जी प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक आहे. या कालावधीत रशियाच्या बेंचमार्कमध्ये 1.64 पट, ब्राझीलमध्ये 1.60 पट आणि चीनमध्ये 1.59 पट वाढ झाली.
State Bank of India Economist estimates that the market capitalization of Indian companies grew the fastest in the world’s major economies last year. However, the country’s gross domestic product (GDP) declined during this period. This could pose a threat to the country’s financial stability.
 
PL/KA/PL/23 JUNE 2021
 

mmc

Related post