राज्यभरात होणार सावरकर विचार जागरण सप्ताह

 राज्यभरात होणार सावरकर विचार जागरण सप्ताह

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाच्या वतीने २१ मे ते २८ मे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात -“वीरभूमि परिक्रमा” या अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सावरकरजींची जन्मभूमी भगूरमध्ये भव्य थीम पार्क आणि संग्रहालय बांधण्यात येत असून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जिथे जिथे आपले सामाजिक आणि धार्मिक कार्य केले तिथे तिथे वेगवेगळ्या प्रकारे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे असे लोढा म्हणाले.

रत्नागिरी इथे सामाजिक समरसतेचे प्रतीक कार्यक्रम असेल. येथे सावरकर यांनी हिंदू समाजाच्या एकतेचा आणि सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पाया घातला. येथे त्यांनी सर्व जातीच्या हिंदूंना मुक्त प्रवेश असलेले पतितपावन मंदिर उभारले आणि मुलींसाठी शाळाही सुरू केली. अंदमाननंतर येथील कारागृहात त्यांनी दोन अडीच वर्षे कारावास आणि १३ वर्षे स्थानबद्धतेची शिक्षा भोगली आहे.

नाशिक जिथे त्यांचे जन्मस्थान भगूर आणि नाशिकमध्ये त्यांच्या क्रांतिकारी उपक्रमांची सुरुवात आणि अभिनव भारताची स्थापना झाली.

सांगली येथे सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर काही काळ वास्तव्यास होते आणि तेथेच त्यांचे निधन झाले, तेथे त्यांचे स्मारक आहे.

पुणे- इथे सावरकर महाविद्यालयीन शिक्षणासाठी होते आणि परदेशी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यासाठी परदेशी कपड्यांची होळी केली.

मुंबई- आयुष्याच्या शेवटच्या वर्षात ते इथेच राहिले. वैचारिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून.
येथेच सावरकर सदन मध्ये त्यांनी आत्मर्पण केले.

या सर्व पाचही स्थानावर या सप्ताहाच्या कालावधीत काही कार्यक्रम पुढीलप्रमाणे प्रस्थावित आहेत.यात
अभिवादन यात्रा , लिटरेचर फेस्टिव्हल ,गीत वीर विनायक ,वीरता पुरस्कार
महानाट्य,कौतुक सोहळा आणि किर्तनसेवा यांचा समावेश आहे अशी माहिती लोढा यांनी यावेळी दिली.

ML/KA/PGB
31 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *