केळीच्या खोडापासून सॅनिटरी आणि मॅटर्निटी पॅड

 केळीच्या खोडापासून सॅनिटरी आणि मॅटर्निटी पॅड

जळगाव, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केळीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्हातील महिलांनी केळीच्या टाकाऊ खोडापासून सॅनिटरी आणि मॅटर्निटी पॅड तयार करण्याचा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे.

येथील झाशीची राणी बचत गटाने केळीच्या खोडाचा लगदा तयार करून त्यापासून कापूस सदृश्य घटक तयार करून त्यापासून पॅड्स तयार केले आहेत. हे पॅड्स उपयुक्त असण्याबरोबरच स्वस्तही आहेत. बचत गटाने हे पॅड्स अधिकाधीक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती उपक्रमही हाती घेतले आहेत.

सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कृत्रिम मटेरिअल वापरून तयार केलेल्या आणि रासायनिक घटक असलेल्या सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे महिलांना आरोग्य विषयक तक्रारी निर्माण होतात. तसेच कृत्रिम साहित्यापासून तयार केलेले हे पॅड्स वापरून झाल्यावर त्यांची विल्हेवाट लावणेही कठीण होऊन बसते. आता केळीच्या खोडापासून पॅड्स तयार करण्याचा उपक्रम यशस्वी झाल्यामुळे भविष्यातही अशा नैसर्गिक साहित्यापासून पॅड्स निर्माण करण्याच्या उद्योगाला चालना मिळेल. यामुळे महिलांचे आरोग्य राखण्याबरोबरच पॅड्सची विल्हेवाट लावण्याचा प्रश्नही मार्गी लागू शकेल.

SL/KA/SL

22 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *