मुंबई उपमहापौर संजय घाडी यांनी सूर्यकांत वगळ हॉस्पिटलची केली पाहणी

 मुंबई उपमहापौर संजय घाडी यांनी सूर्यकांत वगळ हॉस्पिटलची केली पाहणी

मुंबई, दि १२
गिरगाव, जावबावाडी येथील सूर्यकांत वगळ प्रस्तुतिगृह्यामध्ये विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. याबाबत स्थानिक नागरिकांनी सूचना केल्यावर मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी आज या रुग्णालयाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांना स्थानिक नागरिकांनी या प्रसितिगृहामध्ये विविध सोयी सुविधांचा अभाव असून या प्रसूतीगृहाची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती होणे फार गरजेचे आहे. तसेच रुग्णालयामध्ये नर्सिंग स्टाफ देखील कमी असल्याने या ठिकाणी रुग्णांना सोयी सुविधा पुरवणे फार अवघड होत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि रुग्णांनी या प्रसूतीगृहाची त्वरित दुरुस्ती करावी अशी सूचना उपमहापौर संजय घाडी यांना केली.
सूर्यकांत वगळ हे महापालिकेचे प्रसूतीगृह असून हे फार जुने प्रसूतीगृह आहे. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सोयी सुविधांचा अभाव असल्याचे आणि नर्सिंग स्टाफ देखील कमी असल्याचे या पाहणी दौऱ्यामध्ये आढळले. त्यानुसार मी महापालिका प्रशासनाला आदेश दिला असून लवकरच या प्रशुतीगृहाची अद्यावत दुरुस्ती होईल तसेच येथील नर्सिंग स्टाफ देखील वाढवण्यात येतील. त्यामुळे हे रुग्णालय पुन्हा रुग्णांच्या सेवेसाठी सर्व सोयी सुविधायुक्त तयार होईल अशी माहिती मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी या पाहणी दौऱ्या दरम्यान दिली. या दौऱ्यामध्ये शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख दिलीप नाईक, कुलाबा विधानसभा प्रमुख यशवंत कोळेकर, सी विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अलका ससाने, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयाचे डॉक्टर अभिजीत वर्पे, माजी नगरसेवक व शिवसेना उपनेते दिलीप नाईक, प्रसूतीगृहाचे कर्मचारी, शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *