बिग बॉस चाहत्यांसाठी सलमान खानची Bad News

बिग बॉस १८ चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. यंदाचा सीझन १०७ दिवस चालला. करणवीर मेहराने यंदा ट्रॉफी जिंकली. सलमान खाननेच यंदाचाही सीझनचं होस्टिंग केलं होतं. गेल्या १४ वर्षांपासून तो बिग बॉस होस्ट करत आहे. त्याच्या होस्टिंगची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. दरम्यान आता पुढचा सीझन सलमान होस्ट करणार नाही असा खुलासा केला आहे. आता पुढचं सीझन होस्ट करणं मला शक्य नाही. बीग बॉसच्या स्टेजवर येण्याचा हा माझा शेवटचा दिवस आहे, असे सलमानने म्हटले आहे. त्यामुळे बीग बॉसचे चाहते यामुळे नक्कीच दुखावले असतील.