Royal Enfield Himalayan 750 ची भारतात एन्ट्री
मुंबई, दि. २८ : हौशी भारतीय रायडर्ससाठी रॉयल एनफिल्डने हिमालयन ७५० भारतीय बाजारपेठेत आणली आहे. EICMA 2026 २०२६ मधील जागतिक पदार्पणानंतर आणि गोव्यातील मोटोव्हर्सच्या पहिल्या दिवशी झालेल्या प्रदर्शनानंतर ही बाईक आता विक्रीसाठी सज्ज आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार याची एक्स-शोरूम किंमत ४.८९ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी ६.२९ लाख रुपये मोजावे लागतील. सर्वसामान्य ग्राहकांसाठी बुकिंग १ डिसेंबरपासून अधिकृत वेबसाइट आणि डीलरशिप्सवर सुरू होईल. कंपनीने अद्याप बाईकच्या डिलिव्हरीची तारीख जाहीर केलेली नाही.
- रॉयल एनफिल्ड हिमालयन ७५० भारतात तीन व्हेरिएंट्स आणि पाच रंगांमध्ये उपलब्ध करून दिली आहे. अॅलॉय रिम व्हेरिएंट अॅझ्टेक ग्रीन आणि टेक्टॉनिक ब्लॅक या रंगांमध्ये मिळतो. ट्यूबलेस क्रॉस-स्पोक रिम व्हेरिएंट व्हायकिंग ब्रॉन्झ आणि सायबेरिया व्हाइट या रंगांमध्ये सादर केला आहे, तर टॉप व्हेरिएंट अंटार्कटिक सिल्व्हर रंगात येतो.
- टॉप व्हेरिएंटमध्ये जीआयव्हीआय (GIVI) अॅक्सेसरीजचा पॅकेज दिला असून, त्यात टॉप बॉक्स, पॅनियर्स, हीटेड ग्रिप्स, हँडगार्ड्स आणि अॅल्युमिनियम स्किड प्लेट यांचा समावेश आहे. हे अॅक्सेसरीज ग्राहक इतर चार कमी किमतीच्या रंगांवरही स्वतंत्रपणे बसवून घेऊ शकतात.
- या बाईकमध्ये ७४३ सीसी पॅरेलल-ट्विन इंजिन बसवले आहे, जे कंपनीच्या आधीच्या ६४८ सीसी इंजिनचे मोठे अपडेटेड रूप मानले जाते. हे इंजिन ७,००० आरपीएमवर ५५ एचपी पॉवर आणि ५,००० आरपीएमवर ६३ एनएम टॉर्क निर्माण करते, तसेच याला ६-स्पीड गिअरबॉक्स जोडला आहे.
- कंपनीच्या दाव्यानुसार, एकूण टॉर्कपैकी ९० टक्के भाग ३,५०० आरपीएमवरच मिळतो, ज्यामुळे कमी वेग असतानाही ऑफ-रोडिंगमध्ये चांगली ताकद मिळते.
- चाकांच्या रचनेत पुढील बाजूला १९ इंच आणि मागील बाजूला १७ इंचाचे व्हील दिले आहे. अॅलॉय व्हील व्हेरिएंटमध्ये सीएट क्रॉसरॅड एटी (CEAT Crossrad AT) टायर्स तर क्रॉस-स्पोक व्हील मॉडेलमध्ये व्ह्रेडस्टेन सेंटुरो एक्सआर (Vredestein Centauro XR) टायर्स वापरले आहेत.
SL/ML/SL