‘NAVYA 2.0’महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण संधी देणारा उपक्रम

 ‘NAVYA 2.0’महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण संधी देणारा उपक्रम

नवी दिल्ली,दि. २८ : केंद्र सरकारने आज ‘NAVYA 2.0’ हा उपक्रम सुरू केला आहे. याचा उद्देश तरुण महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी विस्तारणे हा असून, यात २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०० जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विशेषतः आकांक्षी (aspirational) आणि दुर्गम भागांवर भर देण्यात आला आहे.

‘NAVYA’ (Nurturing Aspirations through Vocational Training for Young Women and Adolescent Girls – तरुण महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाद्वारे आकांक्षांना प्रोत्साहन) २.० या उपक्रमाचे उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी आणि कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जयंत चौधरी यांनी हरिद्वार येथील उत्तराखंड संस्कृत संस्थानम येथे संयुक्तपणे केले.

या उपक्रमांतर्गत, पात्रतेसाठी वयोमर्यादा १६-१८ वर्षांवरून वाढवून १६-२५ वर्षे करण्यात आली आहे. यामध्ये उद्योगांशी संबंधित, उदयोन्मुख आणि अपारंपरिक क्षेत्रांतील कामांसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामुळे रोजगार, शिकाऊ उमेदवारी (apprenticeship) आणि उद्योजकतेच्या संधींचे मार्ग खुले होणार आहेत.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *